तामिळ अभिनेता सूर्या खूप लोकप्रिय आहे. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. अशाच त्याच्या एका चाहत्याचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर अभिनेत्याने चाहत्याच्या घरी भेट देत श्रद्धांजली वाहिली. सूर्याचे चाहत्याच्या कुटुंबाबरोबरचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

“माझे फोटो पॉर्नोग्राफिक साइटवर…”, जान्हवी कपूरने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाली, “माझे मित्र-मैत्रिणी…”

सूर्याचा अरविंद नावाचा एक चाहता एन्नोरमध्ये राहत होता. पण त्याचा अपघाती मृत्यू झाला. ही बातमी कळाल्यानंतर सूर्याने घरी जाऊन अरविंदला आदरांजली वाहिली. त्‍याने त्याच्या कुटुंबाला धीर दिला आणि सहानुभूती व्यक्त केली. तसेच त्याने अरविंदचे पालक आणि मित्रांशी बोलून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

सूर्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहते त्याच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. तसेच अनेकांनी चाहत्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सूर्या सध्या दिग्दर्शक शिवासोबत त्याच्या ‘कंगुवा’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात सूर्याबरोबर दिशा पटानी, बॉबी देओल आणि डीओपी नटराज प्रमुख भूमिकेत आहेत.