Sushmita Sen ex-boyfriend Rohman Shawl confesses he can’t afford the diamonds she likes : अभिनेत्री सुष्मिता सेन आणि मॉडेल रोहमन यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं. काही वर्षांच्या नात्यानंतर दोघांनी ब्रेकअपचा निर्णय घेतला होता. मात्र, ब्रेकअपनंतरही त्यांच्यातील मैत्री अजूनही कायम असल्याचं अनेकदा दिसून येतं.
रोहमन अनेकदा सुष्मिता आणि तिच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवताना दिसतो. इतकंच नव्हे तर विविध कार्यक्रमांमध्येही त्याला सुष्मिताबरोबर पाहिलं जातं. रोहमनचा स्वभाव पाहता त्याला नेटकऱ्यांनी ‘ग्रीन फ्लॅग’चा टॅगसुद्धा दिला आहे.
इन्स्टंट बॉलीवूडला दिलेल्या अलीकडच्या मुलाखतीत, रोहमनने सुष्मिताला डायमंड गिफ्ट देण्याबद्दल उघडपणे सांगितले. तो म्हणाला की ‘बीबी नंबर १’ अभिनेत्रीला तिच्या आवडीचा डायमंड गिफ्ट देण्याइतपत माझी तितकी पात्रता नाही.
रोहमन शॉल काय म्हणाला?
जेव्हा रोहमनला विचारण्यात आले की त्याने सुष्मिताला डायमंड गिफ्ट दिले आहे का किंवा तिला कधी मिळाला आहे का, तेव्हा तो म्हणाला, “तिला ज्या प्रकारचे डायमंड आवडतात, तेवढे मोठे डायमंड गिफ्ट देण्याइतपत माझी तितकी पात्रता नाही, म्हणून ज्या दिवशी मी इतका मोठा डायमंड खरेदी करू शकेन, इन्शा अल्लाह, मी तो नक्कीच खरेदी करेन.”
सुष्मिताला कोणता हिरा आवडतो?
जेव्हा रोहमनला विचारण्यात आले की सुष्मिताला कोणत्या प्रकारचा हिरा आवडतो, तेव्हा तो म्हणाला, “तिचा एक आवडता हिरा आहे, तो २२ कॅरेटचा आहे. त्यामुळे तो मिळवण्यासाठी बराच वेळ लागणार आहे, पण इन्शा अल्लाह लवकरच…”
२०२१ मध्ये सुष्मिताने इन्स्टाग्रामवर तिच्या ब्रेकअपची घोषणा केली होती. अभिनेत्रीने रोहमनबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, “आम्ही मित्र म्हणून सुरुवात केली होती, आम्ही मित्रच राहू. नाते खूप आधी संपले होते… प्रेम अजूनही आहे.”
ब्रेकअपनंतरही सुष्मिता आणि रोहमन यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. अनेकदा चाहते असेही म्हणाले आहेत की, दोघांनी पॅचअप केले आहे. सुष्मिता आणि रोहमन यांनी त्यांच्या नात्याबद्दल पुन्हा कधीही काहीही सांगितले नाही. रोहमन आणि सुष्मिता आता वेगळे झाले आहेत, त्यामुळे तो अभिनेत्रीला हिरा भेट देईल अशी शक्यता कमी आहे.