‘चांगले वर्तन कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे…’, स्वरा भास्करचे ट्वीट चर्चेत

स्वराने ट्वीट करत शाहरुख खानला पाठींबा दिला आहे.

swara bhaskar, swara bhaskar tweet, shahrukh khan, gauri khan,

क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास १५ दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाहीये. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार असली, तरी इकडे एनसीबीच्या विशेष न्यायालयातील सुनावणीमध्ये या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, अभिनेत्री स्वरा भास्करने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.

स्वरा ही सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. नुकताच स्वराने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे. ‘चांगले वर्तन कसे असावे याचे शाहरुख खान एक उदाहरण आहे. माझ्यासाठी, एक आदर्श व्यक्ती म्हणून त्याच्याकडे सर्व गुण आहेत. वैयक्तिकरित्या तो माझ्यासाठी प्रेरणाही आहे. त्याच्यासाठी आणि गौरीसाठी मी प्रार्थना करत आहे’ या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे.
पाहा : शाहरुख खानचा ‘मन्नत’ आतून कसा दिसतो पाहिलंय का?

स्वरा भास्करसोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानला पाठिंबा दिला होता. आता स्वराने देखील ट्वीट करत पाठिंबा दिला आहे. ७ तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. ही न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असल्यामुळे त्यावर पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यावेळी आर्यन खान आणि इतर आरोपींची पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Swara bhaskar tweet and support shahrukh khan avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या