‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून आपलं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मालिका सुरु झाली तेव्हा छोट्या टप्पूने प्रेक्षकांच्या मनात जागा केली होती. मात्र, आता मालिकेत टप्पूची भूमिका अभिनेता राज हा साकारत आहे. तरी देखील अनेकांच्या मनात भव्य गांधीच्या आठवणी आहेत. भव्य सध्या गुजराती चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. सध्या भव्य एका अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

भव्य आता अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दिगांगना वीरा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. रिपोर्टनुसार दोघेही एका अवॉर्ड शोमध्ये भेटले होते. तिथून त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर हे प्रेमात झालं असं म्हटलं जातं.

आणखी वाचा : “२०१४ पूर्वी कंगना हृतिक आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती…”, म्हणतं अभिनेत्याने उडवली खिल्ली

दिगांगनाने २००२ मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यावेळी दिगांगना ही केवळ ७ वर्षांची होती. ‘क्या हादसा क्या हकीकत’ या मालिकेमध्ये ती दिसली होती, पण ‘एक वीर की अरदास वीरा’ या मालिकेमधून तिला खरी ओळख मिळाली.

आणखी वाचा : “तर निक माझा जीव घेईल…”, प्रियांकाला वाटते पतीची भीती

आणखी वाचा : “माझी मोलकरीण साडीत तुझ्या पेक्षा चांगली दिसते”, म्हणणाऱ्या नेटकऱ्यावर संतापली स्वरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या आधी भव्य तारक मेहता या मालिकेत सोनूची भूमिका साकारणाऱ्या निधी भानुशालीसोबत भव्यचं नाव जोडण्यात आलं होतं. दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्या दोघांनी हे स्पष्ट केले होते की निधी त्यांची चांगली मैत्रीण आहे. आता भव्यच्या आयुष्यात एक नवीन मुलगी आल्याचं म्हटलं जातं आहे.