बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी आणि निर्माती ताहिरा कश्यप ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. एक आई म्हणून ताहिराला किती संघर्ष करावा लागला असे ताहिराने सांगितले आहे. एकदा ताहिरा तिच्या मुलाला एका रेस्टॉरंटमध्ये विसरली होती. हा खुलासा ताहिराने ‘द 7 सिन्स ऑफ बींग ए मदर’ या पुस्तकाच्या लॉन्चच्या वेळी केला आहे.

ताहिराची २ मुलं आहेत. एकाचे नाव विराजवीर आहे. विराजवीरचा जन्म हा २०१२ साली झाला आहे. तिला एक मुलगी आहे. तिचे नाव वरुष्का आहे. वरुष्काचा जन्म २०१४ साली झाला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ताहिरा विराजवीरला रेस्टॉरंटमध्ये विसरल्याचे तिने सांगितले आहे.

आणखी वाचा : शाहरुखनंतर गौरी खान आर्थर रोड तुरुंगात, मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी रवाना

ताहिराने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. विराजवीरच्या जन्मानंतर ही घटना झाल्याचे ताहिराने सांगितले आहे. “मी माझ्या मुलाला एका रेस्टॉरंटमध्ये विसरले होते. मी माझ्या मुलाला विसरली. तेव्हा एक वेटर धावत आला आणि म्हणाला मॅडम तुम्ही तुमच्या मुलाला विसरलात. मला खूप लाज वाटली आणि लोक माझ्याकडे बघत होते.” ताहिरा म्हणाली की त्यावेळी विराजवीर हा काही महिन्यांचा होता.

आणखी वाचा : “एक आई आपल्या मुलाला…”, मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे अर्जुन झाला ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताहिराने तिच्या पुस्तकात हा किस्सा देखील सांगितला आहे. , “दुपारी मी माझ्या सगळ्या मित्र-मैत्रिणींसोबत जेवायला बाहेर गेली होती. त्यानंतर मी त्यांना मिठी मारली आणि लिफ्टच्या दिशेने आम्ही लिफ्टच्या दिशेने निघालो. तेवढ्यात स्टाफमधला एक सदस्य माझ्यादिशेने धावत आला आणि लिफ्टबंद होऊनये म्हणून त्याने दारात पाय ठेवला. ‘मॅडम, तुम्ही तुमच्या मुलाला विसरलात!’ लिफ्टमधले असलेल्या सगळ्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला, ते मी कधीच विसरू शकणार नाही. लोक बिल भरणे विसरतात किंवा बॅग विसरतात. मी माझ्या बाळाला विसरले, तरीही मी माझी बॅग धरली होती. किती निर्दयी आई आहे? “