राष्ट्रीय पुरस्कार विजेते तमिळ दिग्दर्शक वेत्रीमारन यांनी राजा चोल हा हिंदू राजा नव्हता, असे विधान केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यात आता अभिनेते कमल हासन यांनीही उडी मारली आहे. दिग्दर्शक वेत्रीमारन यांनी केलेल्या विधानाचे कमल हासन यांनी समर्थन करुन त्यांची बाजू मांडली आहे. त्यामुळे राजा चोल यांच्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

आणखी वाचा : Video: ‘आदिपुरुष’ला मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे प्रभास दिग्दर्शक ओम राऊतवर चिडला?, व्हिडिओ व्हायरल

या सगळ्याची सुरुवात एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे झाली. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक वेत्रीमारन यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ते म्हणाले, “राजा चोल हे हिंदू नव्हते पण ते (भाजपा) आमची ओळख चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी याआधीही तिरुवेल्लुवरचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण त्यांना हे कधीही करु नाही दिलं पाहिजे”.

त्यानंतर आता अभिनेते कमल हासन यांनी दिग्दर्शक वेत्रीमारन यांची बाजू घेत मत मांडले. ते म्हणाले, “चोल राजाच्या काळात ‘हिंदू धर्म’ असे कोणतेही नाव नव्हते. तेव्हा वैनवम, शिवम आणि समनम असे लोकांना संबोधले जायचे. परंतु या सगळ्या लोकांना एकत्रित कसे संबोधायचे म्हणून ब्रिटिशांनी ‘हिंदू’ हा शब्द आणला. हे थुथुकुडी तुतीकोरीनमध्ये बदलण्यासारखेच आहे.”

दिग्दर्शक वेत्रीमारन यांना कमल हासन यांच्याकडून पाठिंबा मिळाला असला तरी, भाजपाने वेत्रीमारन यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा नेते एच राजा यांनी म्हटले आहे की, “राजा चोल हे हिंदू राजाच होते.” त्यासोबतच “वेत्रीमारन यांच्याइतकी मला इतिहासाची जाण नाही. पण राजा चोल हे हिंदू नव्हते, तर मग त्यांनी बांधलेल्या दोन चर्च आणि मशिदींची नावं वेत्रीमारन यांनी सांगावीत. खरंतर राजा चोल स्वतःला शिवपद सेकरन म्हणत. मग ते हिंदू नव्हते का?” असा प्रश्न एच. राजा यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : ज्युनियर एनटीआरच्या आगामी ‘एनटीआर-31’बद्दल मोठी अपडेट, येणार ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजा चोल यांच्याबद्दल तामिळनाडूमध्ये करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१९ मध्ये चित्रपट दिग्दर्शक पी. ए. रणजित यांनी राजा चोल यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला होता. “राजा चोल यांचा कालखंड दलितांसाठी काळा कालखंड होता. दलितांकडून जमिनी जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या होत्या आणि राजा चोलच्या कारकिर्दीत अनेक प्रकारचे जातीय अत्याचार सुरू होते,” असे विधान रणजित यांनी केले होते.