अनेक मराठी कलाकार आता अभिनयाबरोबरच हॉटेल व्यवसायातही उतरले आहेत. असेच एक कलाकार म्हणजे आनंद काळे. आनंद काळे अभिनेत्याबरोबर हॉटेल व्यवसायिकही आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. याचा परिणाम सर्वसामांन्यांप्रमाणे हॉटेल व्यवसायिकांवरही झाला आहे. टोमॅटोच्या भाववाढीदरम्यान आनंद काळे यांनी ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत काळे यांनी ऑफरची घोषणा केली आहे.
हेही वाचा- “पेंग्विनची काय गरज…” शशांक केतकरने बस स्टॉपवरील ‘तो’ फोटो केला शेअर, कॅप्शन चर्चेत
टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे अनेक हॉटेल मालकांनी टोमॅटोचा वापर करणे कमी केलं आहे. काहींनी तर टोमॅटोचा वापर करणच बंद केलं आहे. पण आनंद काळे यांनी या टोमॅटोच्या वाढत्या दरातही ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. आनंद काळे यांची कोल्हापूरात ‘राजपुरुष’ आणि ‘कार्निवल’ अशी दोन हॉटेल आहेत. यातील ‘कार्निवल’ हॉटेलमधील ग्राहकांसाठी आनंद यांनी खास ऑफर आणली आहे.
आनंद काळे यांनी ऑफरमध्ये लिहंल आहे. ‘मॅकच्या डोनाल्ड काकाला नाही परवडत..पण कोल्हापूरकरांच नाही तटतं… ३३ फ्रेश टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये बनवलेलं बटर चिकन आहे त्याचदरात.’ बाहेर टोमॅटोचे दर वाढत असताना आनंद काळे यांनी आपल्या हॉटेमध्ये अस्सल टोमॅटोच्या ग्रेव्हीत बनलेल्या बटर चिकनचे दर मात्र तेवढेच ठेवले आहेत.
जूनच्या २४ तारखेपर्यंत देशभरात टोमॅटोचे सरासरी दर २० ते २५ रुपये इतके होते. ते ३० जून रोजी १०० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. उत्तराखंडमधील काही शहरांत २०० ते २५० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे. मुंबई आणि परिसरातही टोमॅटोला १२० ते १६० रुपये किलो असा भाव आहे.
हेही वाचा- “पेंग्विनची काय गरज…” शशांक केतकरने बस स्टॉपवरील ‘तो’ फोटो केला शेअर, कॅप्शन चर्चेत
टोमॅटोचे वाढते दर आणि घटता दर्जा यांमुळे मॅकडोनाल्ड्स इंडियाच्या उत्तर आणि पूर्व भारतातील उपाहारगृहांनी बर्गरमध्ये टोमॅटोचा वापर बंद केला आहे. ‘आमच्या गुणात्मक निकषांप्रमाणे टोमॅटोचा दर्जा नसून, त्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे तूर्तास आम्ही आमच्या पदार्थामध्ये टोमॅटोचा वापर थांबवला आहे,’ असे कंपनीने म्हटले आहे.