छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सर्वच कलाकार हे प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून मिलिंद गवळी यांना ओळखले जाते. यात ते अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तीरेखा साकारत आहेत. नुकतंच त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारे यांच्या मुलाच्या महाराज या हॉटेलसाठी खास पोस्ट केली आहे.

अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहिर पाठारे हा प्रोफेशनल शेफ आहे. परदेशात प्रसिद्ध असणारी फूड ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली. तिथे यश मिळवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याने ठाण्यात स्वतःचं ‘महाराज’ हे नवीन हॉटेल सुरू केलं. यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी या हॉटेलचे आणि तेथील पदार्थांचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “मराठी सिनेसृष्टीत असा एकही नट नाही ज्याच्यासाठी…”, किरण माने स्पष्टच बोलले

मिलिंद गवळी यांची पोस्ट

“महाराज हॉटेल, सुप्रिया पाठारे यांचा चिरंजीव मिहीर यांनी ठाण्यामध्ये महाराज नावाचं एक हॉटेल सुरू केला आहे. स्टार प्रवाहच्या दिवाळी सोहळ्यामध्ये माझी आणि सुप्रियाची भेट झाली, तेव्हा मला तिच्याकडून कळलं की मिहीरने हॉटेल सुरू केला आहे.

मी मिहीरला अगदी लहानपणापासून ओळखतो, मिहीर ला शेफ व्हायचं होतं हे त्यांनी फार पूर्वीच आपल्या आई-वडिलांना सांगितलं होतं, मधल्या काळामध्ये त्यांनी एक फूड ट्रक सुरू केला होता, आणि आता त्यांनी महाराज नावाचं हॉटेल. passion , जिद्द , आवड या गोष्टी यशस्वी होण्यासाठी मुलांमध्ये हव्यात असतात, विहीर मध्ये शेफ बनण्याचं passion , ते फॅशन मला परवा प्रत्यक्षात पाहायला मिळालं, ज्यावेळेला त्याच्या हॉटेलला जेवणासाठी गेलो होतो,

तू स्वतः पावभाजी बनवत होता आणि ते बनवत असताना तो त्यामध्ये रमला होता, अगदी मन लावून तो ती पावभाजी बनवत होता, मला आणि दीपाला पाहिल्यानंतर तो म्हणाला मामा तुम्ही बसा मी तुम्हाला स्पेशल हरियाली पावभाजी खायला घालतो,

त्याने आम्हाला अतिशय चविष्ट पद्धतीच्या दोन वेगवेगळ्या पावभाज्या खाऊ घातल्या, त्यानंतर मस्त तवा पुलाव, त्यानंतर थोड्या वेळाने सुप्रिया हॉटेलमध्ये आली आम्ही गप्पा मारत बसलो पण माझं लक्ष मिहीर कडे होतं, तू अगदी एकाग्रतेने त्याचं काम करत होता, विराट कोहली तेंडुलकर कसं मन लावून त्यांचा तो खेळ खेळत असतात तसाच मिहीर त्याच्या आवडीचा खेळ खेळत होता, चविष्ट चवदार पदार्थ बनवून लोकांना खाऊ घालत होता.

खरंच मला अभिमान वाटतो मिहीर सारख्या मुलांचा, तो त्याचं प्याशन जोपासतोय कष्ट करतोय, आई-वडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी करतोय, जेव्हा आपण आजूबाजूला त्याच्याच वयाचे त्याच्या पिढीतले मुलं , आई बापाच्या जीवावर नुसती मजा करताना पाहतो, स्वतःची काम सोडून अभ्यास सोडून वर्ल्ड कपच्या मॅचेस मध्ये रमलेले पाहतो, आणि महत्त्वाचं म्हणजे एक मराठी मुलगा बिझनेस करतोय, धंद्यामध्ये उतरला आहे, हीच यशाची पहिली पायरी आहे,

आणि खरंच मी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो की भारतभर महाराज हॉटेलच्या शाखा उघडू देत, मिहीरला आणि त्याच्या या नवीन व्यवसायाला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा… यशस्वी भव. आणि तुम्ही ठाण्यात असाल, डॉक्टर काशिनाथ घाणेकर सभागृहाच्या परिसरात असाल आणि पावभाजी खायची इच्छा झाली तर नक्की मिहीर च्या हॉटेल महाराज ला भेट द्या..”, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “हिंदीत काम करण्याचा अनुभव कसा आहे?” चिन्मय मांडलेकरने सांगितला फरक, म्हणाला “मराठी सिनेसृष्टीत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहते कमेंट करत आम्ही महाराज हॉटेलला भेट देऊ, असे सांगताना दिसत आहेत. त्यावर सुप्रिया पाठारे यांनीही नक्की या असे सांगितले आहे.