‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर गाजलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ने नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांचा अविरत मनोरंजन केलं. महाराष्ट्राच्या घराघरात ही मालिका पोहोचली. या मालिकेतील कलाकारांनी आपापली पात्र उत्तमरित्या निभावली. त्यामुळे आज ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांना त्यांच्या पात्रांवरून अधिक ओळखलं जातं. यापैकी एक म्हणजे यश देशमुख. अभिनेता अभिषेक देशमुखने यशची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. याच यश म्हणजेच अभिषेकची पत्नी कृतिका देवने नुकताच एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी कृतिका देवदेखील एक उत्तम अभिनेत्री आहे. नाटक, चित्रपट, वेब सीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये तिने काम केलं आहे. कृतिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक डान्स व्हिडीओ शेअर केला. तिच्या या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Video: ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीने भावाच्या लग्नात आजीबरोबर ‘झिंगाट’ गाण्यावर केलेला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये कृतिका बिपाशा बासूचं गाणं ‘नमक इश्क का’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या या डान्सवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अभिनेत्री अश्विनी महांगडे, अमृता देशमुख, अपूर्व रांजणकर यांसह चाहत्यांनी कृतिकाच्या डान्सचं, हावभावाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – सूरज चव्हाण वाढदिवसाला न आल्यामुळे घनःश्याम दरवडे झाला भावुक, म्हणाला, “आम्हाला बॅनर लावायचे होते तेव्हा…”

हेही वाचा – Bigg Boss 18: १२व्या आठवड्यात हृतिक रोशनची लाइफ कोच झाली एविक्ट; म्हणाली, “कशिशमुळे मी आज बाहेर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिषेक देशमुख आणि कृतिका देवचं लग्न ६ जानेवारी २०१८मध्ये झालं होतं. नोंदणी पद्धतीने दोघांचा लग्नसोहळा झाला होता. कृतिका देवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिची गेल्या वर्षी ‘ताली’ नावाची वेब सीरिज चांगलीच गाजली होती. रवी जाधव दिग्दर्शित ‘ताली’ वेब सीरिजमध्ये कृतिका देव हिने गौरी सावंत यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.