‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत अभिनेत्री अश्विनी महांगडे ही अनघा हे पात्र साकारत आहे. अश्विनी महांगडे हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या आयुष्याचा जोडीदार नीलेश जगदाळेने वाढदिवसाची एक खास पोस्ट शेअर केली आहे.

नीलेश जगदाळेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केला आहे. या व्हिडीओत अश्विनीही नीलेशबरोबर संवाद साधताना दिसत आहे. यात ती विविध विषयांवर चर्चा करताना दिसत आहे. त्याने हा व्हिडीओ पोस्ट करत त्याबरोबर तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्याचा जोडीदार, नात्यावर शिक्कामोर्तब करीत म्हणाली…

“या आपल्या ८ वर्षांच्या प्रवासात खुप चढ-ऊतार, सुख-दुखः पाहीले, खुप लोकांचा सहवास लाभला, काहींनी जोडून ठेवले तर काहींनी तोडले पण त्यातूनही कायम राहिले ते आपण ८ वर्षांपूर्वी जोडलेले नातं. आईने सागितल्याप्रमाणे माणूस नेहमी मोठा असायला हवा व ते कायम जपायला हवे. नानांना दिलेल्या शब्दांपासून कधी मागे हटणार नाही, कायम सोबत आहे.

वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा बछडी, खुप मोठी हो. Love You. तिला बोलायला आवडते आणि मला ऐकायला”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : अश्विनी महांगडेच्या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, म्हणाली “याचा शेवटचा भाग…”

अश्विनीने काही महिन्यांपूर्वी एक पोस्ट शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यावेळी तिने नीलेश जगदाळेबरोबरचा एक फोटो पोस्ट केला होता. आधार देणाऱ्याचे मन निर्मळ असावे आणि ते अनेक संकटांमधून गेल्यावरच समजते, असे लिहिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नीलेश जगदाळे हा फार्मफ्रेश ऑरगॅनिक फ्रेशचे मालक आहेत. याबरोबरच त्यांनी अश्विनीसोबत ‘फ्लाइंग एन्जल लेट्स फ्लाय’ ही कंपनीदेखील सुरू केली आहे. तर ते ‘रयतेचे स्वराज्य’ प्रतिष्ठानचे सदस्यही आहेत.