अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. राम मंदिराबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. आत्तापासूनच अयोध्येत पयर्टकांची गर्दी सुरु आहे. राजकारणींपासून अनेक बॉलीवूड कलाकारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या निमंत्रण पत्रिकेची झलकही शेअर केली आहे.
दर बॉलीवूड कलाकाराबरोबर आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीलाही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित कऱण्यात आले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसले आहे. रुपालीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची निमंत्रण पत्रिका मिळाली आहे. रुपालीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या पत्रिकेची झलकही दाखवली आहे. या व्हिडीओला तिने “जय श्री राम. अक्षत निमंत्रण” अशी कॅप्शनही दिले आहे.
‘या’ कलाकारांना मिळाले सोहळ्याचे निमंत्रण
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी २२ जानेवारीला एक लाखाहून अधिक भाविक अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. अभिनेते रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अक्षय कुमार, रजनीकांत, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, ऋषभ शेट्टी मधुर भांडारकर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अजय भट्ट, सनी देवल , प्रभास, यश, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा- १२०० ची साडी, २०० रुपयांचे कानातले अन्…; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितली लग्नाची गोष्ट, म्हणाली…
१६ जानेवारीपासून होणार कार्यक्रमांना सुरुवात
दरम्यान १६ जानेवारीपासूनच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. या सोहळ्याला देशभरातून जवळपास ४००० साधू संत उपस्थित राहणार आहे. एवढेच नाही तर ७ हजाराहून अधिक पाहुण्यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर २३ जानेवारीपासून राम मंदिर सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे.