‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व संपायला अवघे काही दिवस आता शिल्लक राहिले आहेत. येत्या ८ जानेवारीला या पर्वाच्या विजेत्याची घोषणा केली जाणार आहे. बिग बॉसचे चौथे पर्व हे विविध कारणांमुळे चर्चेत राहिले. पण त्यातच बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेच्या एक पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. यावरुन अनेक चर्चा ही रंगल्या होत्या. आता यामागचे खरं कारण समोर आले आहे. अभिनेता आस्ताद काळेने याबद्दल एक पोस्ट शेअर करत यावर स्पष्टीकरण दिले आहे.
बिग बॉस मराठीचा पहिला सीझन मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग आणि आस्ताद काळे यांनी गाजवला होता. मेघा धाडे याची विजेती ठरली होती. मेघा धाडेने तिच्या फेसबुकवर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. “खरं तर आस्ताद काळेच आमच्या सीझनचा विजेता असायला हवा होता.” असे मेघाने यात म्हटले होते. त्यावर आता आस्ताद काळेने फेसबुक पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
आणखी वाचा : “खरं तर आस्ताद काळे आमच्या सीझन…” बिग बॉस विजेती मेघा धाडेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
अभिनेता आस्ताद काळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मेघा धाडेने केलेली ती पोस्ट एका गंमतीदार खेळाचा भाग होता असे म्हटले आहे. “मेघा धाडेच्या अधिकृत पेजवर लिहिलेली पोस्ट हा एका गंमतीदार खेळाचा भाग आहे. तुम्ही पत्त्यांच्या त्या विशिष्ट catमधून एक पत्ता ओढायचा, आणि त्यावर सांगितलेली कृती करायची, असा तो खेळ होता. त्यात तिला,”Let someone currently with you post anything on your social media handle” असं आलं होतं. त्यामुळे आमच्या त्या ग्रुपमधला सगळ्यात वात्रट मी असल्यानी मी ती जबाबदारी उचलली”, असे आस्ताद काळेने या पोस्टमध्ये म्हटले.
त्याच्या या पोस्टनंतर मेघा धाडेने एक कमेंट केली आहे. तिने हसतानाचा एक इमोजी शेअर केला आहे. त्यावर आस्तादने ‘मेघा धाडे तुझ्याचसाठी लिहिलं होतं’, असे म्हटले आहे. दरम्यान मेघा धाडेने आस्तादबद्दल केलेली ती पोस्ट काही दिवसांनी डिलीट केली आहे. मात्र त्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. तिने ही पोस्ट का केली, त्यामागचे कारण काय असे विविध चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. मात्र आता त्यामागचे उत्तर समोर आले आहे.