scorecardresearch

मालिका संपताच वल्लीने केलं स्काय डायव्हिंग, अनुभव शेअर करत अभिज्ञा भावे म्हणाली…

आता तिची ही पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.

abhidnya

अभिज्ञा भावे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेले काही महिने ती ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. तर आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेचे शूटिंग संपताच अभिज्ञा तिच्या कुटुंबीयांबरोबर दुबईला फिरायला गेली. तिथे जाऊन तिने एक अविस्मरणीय गोष्ट केली.

अभिन्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती तिच्या कामाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांची शेअर करत असते. आता दुबईला जाऊन तिने स्काय डायव्हिंग केलं आणि तिचा तो अनुभव तिने एका पोस्टमधून सर्वांशी शेअर केला.

आणखी वाचा : मालिका संपताच अभिज्ञा भावेचा व्हेकेशन मोड ऑन, कुटुंबियांबरोबर अबू धाबीला घेतेय सुट्ट्यांचा आनंद

अभिज्ञाने तिचा स्काय डायव्हिंग करतानाचा फोटो पोस्ट केला आणि लिहीलं, “तुम्हाला माहीत आहे मी हे कधीच ठरवलं नव्हतं. अगदी माझ्या आयुष्यासारखं. मला तसं वाटलं म्हणून मी केलं. मी फक्त प्रवाहाबरोबर वाहत गेले. जसं मी खऱ्या आयुष्यात करते. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं गणित मांडता तेव्हा फार विचार करता. छोट्या छोट्या गोष्टी गूगल करता तेव्हा तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे कळतात आणि मग तुम्ही कधीही काहीही करू शकत नाही. मी उडी मारण्यापूर्वी भीतीपेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवला. खऱ्या आयुष्यात सुद्धा.”

पुढे ती म्हणाली, “आयुष्यातील प्रत्येक चॅलेंज प्रमाणेच समोर जे काही येईल ते मला करावं लागेल असं मी स्वतःला सांगितलं. मला भीती वाटली हार मी हार न मानण्याचा निर्णय घेतला. जसं मला माझ्या आयुष्यातील कठीण काळात वाटत होतं. कारण एकदा तुम्ही भीतीतून बाहेर पडलात की यापूर्वी कधीही न जाणवलेल्या भावना, आनंद, आत्मविश्वास, कृतज्ञता सगळंच तुम्हाला जाणवतं. तुम्हाला हे सर्व तेव्हाच जाणवतं जेव्हा भीती मोठी वाटते, अशक्य वाटतं, पण तुम्ही हार मानत नाही.”

हेही वाचा : “…म्हणून तू माझ्याबद्दलच्या तुझ्या अपेक्षा वाढवू नकोस,” वल्लीने अनामिकासाठी केलेली पोस्ट चर्चेत

शेवटी तिने लिहिलं, “या उडीने मला हेच शिकवलं, जितकी मोठी भीती, तितका मोठा आनंद तुम्ही जिंकल्यानंतर तुम्हाला जाणवेल. काही अनुभव तुम्हाला माणूस म्हणून पूर्णपणे बदलून टाकणारे असतात. माझ्यासाठी हा अनुभव त्यापैकीच एक आहे. माझ्या डायव्हर मिशेलला खूप धन्यवाद. एक अनोळखी व्यक्ती ज्याच्या हातात माझा जीव होता. पण त्याच्या बदल्यात त्याने मला माझ्या आयुष्यातील एक उत्कृष्ट अनुभव दिला.” आता तिची ही पोस्ट प्रचंड चर्चेत आली असून यावर तिचे चाहते आणि त्याचबरोबर मनोरंजनसृष्टीतील तिचे मित्र मैत्रिणी कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 11:44 IST

संबंधित बातम्या