Abhijeet Sawant Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे सध्या मराठमोळा गायक अभिजीत सावंत चांगलाच चर्चेत आहे. घरात पहिल्या दिवसापासून अभिजीत सर्वांबरोबर मिळून मिसळून राहत गेम खेळत आहे. याशिवाय त्याचे जास्त कोणाशी वाद देखील झालेले नाहीत. त्यामुळे अभिजीतचा स्वभाव प्रत्येकाला भावतो. अगदी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सुद्धा अनेकदा अभिजीतचं कौतुक केलं आहे.

‘बिग बॉस’च्या घरात काही दिवसांपूर्वी रितेश देशमुखने एन्ट्री घेतली होती. यावेळी त्याने प्रत्येक सदस्याला कुटुंबीयांकडून आलेले व्हिडीओ मेसेज दाखवले होते. यावेळी अभिजीतच्या दोन्ही मुलींनी लाडक्या बाबासाठी खास व्हिडीओ बनवून पाठवला होता. “तू उत्तम खेळत आहेस…असा खेळत राहा” असं त्याच्या दोन्ही मुली या व्हिडीओमध्ये म्हणाल्या होत्या. आहना आणि स्मिरा अशी त्याच्या मुलींची नावं आहे. तसेच “इंडियन आयडॉल जिंकलास तेव्हा आम्ही नव्हतो पण, आता ‘बिग बॉस’ जिंकताना आम्हाला तुला पाहायचंय” अशी इच्छा त्याच्या दोन्ही मुलींनी व्यक्त केली होती.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : निक्की पुन्हा रडली! ‘ती’ एक चूक पडली महागात, टास्कमध्ये कमावली फक्त ‘इतकी’ रक्कम, नेमकं काय घडलं?

अभिजीतच्या पत्नीने शेअर केला ‘तो’ फोटो

आहना आणि स्मिराचा व्हिडीओ पाहून अभिजीत ( Abhijeet Sawant ) प्रचंड भावुक झाला होता. यावेळी रितेशने त्याला धीर देऊन “आणखी चांगला खेळ” असं त्याला सांगितलं होतं. सध्या हा शो अंतिम टप्प्यात आल्याने सगळे प्रेक्षक घरात ‘फॅमिली वीक’ केव्हा होणार याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘कलर्स मराठी’ने यासंदर्भातील प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये अभिजीतची पत्नी शिल्पा व गायकाच्या दोन मुलींनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिजीतची ( Abhijeet Sawant ) पत्नी शिल्पाने लाडक्या लेकीचा फोटो शेअर करत “भेट झाल्यावर हिचा चेहरा पाहा” असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये स्मिराच्या चेहऱ्यावरचे हावभाव काहिसे दु:खी वाटत आहेत. जवळपास दोन महिन्यांनी बाबाला भेटल्यावर पुन्हा घरी परतताना अभिजीतची लेक प्रचंड नाराज झाल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – अखेर ‘तो’ क्षण आलाच! पत्नी व मुलींना पाहून अभिजीत झाला भावुक, गायकाच्या लेकीची Bigg Boss ला गोड विनंती, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Abhijeet Sawant
Abhijeet Sawant : अभिजीत सावंतची लेक

दरम्यान, कुटुंबीयांना पाहून अभिजीत देखील प्रचंड भावुक झाला होता. पत्नी व मुलींनी त्याला घरात येऊन धीर दिला. ‘बिग बॉस’चा महाअंतिम सोहळा आता ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्यामुळे अभिजीतने यात बाजी मारावी अशी त्याच्या चाहत्यांची मनापासून इच्छा आहे.