‘बिग बॉस मराठी ४’ने अभिनेत्री अमृता देशमुखला नवी ओळख दिली. या पर्वाच्या लोकप्रिय स्पर्धकांपैकी ती एक होती. या पर्वात तिच्या खेळाने तर लक्ष वेधून घेतलंच पण त्याचबरोबर तिची आणि प्रसाद जवादे यांची मैत्रीही चर्चेत आली. आता प्रसादने अमृताबद्दल त्याला काय वाटतं हे कवितेतून व्यक्त केलं आहे.

अमृताबरोबरच अभिनेता प्रसाद जवादेदेखील ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या पर्वामध्ये ते अनेकदा एकत्र दिसले. तर पर्व संपल्यानंतरही त्यांच्यातली ही मैत्री तशीच कायम आहे. आताही अनेकदा ते एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. आता त्याने अमृतासाठी एक खास कविता सादर केली आहे.

आणखी वाचा : प्रसाद जवादेला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर, स्वतःच्या मृत्यूचा उल्लेख करत म्हणाला…

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी तिला कधीही बोलू नाही शकलो; पण मला आवडेल तिच्यासाठी ही कविता सादर करायला आणि तिला हे सांगायला की, मला लाज नाही वाटणार कुठेही तुझ्यासाठी ही कविता बोलायला,” असं म्हणत त्याने कविता ऐकवायला सुरुवात केली. तो म्हणाला, “कैसे बताऊॅं….कैसे बताऊॅं अमृता मेरे लिए तुम कौन हो, तुम धडकनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी,
तुम हर खुशी, तुम प्यार हो, तुम प्रीत हो, तुम गीत हो,
आँखो में तुम, यादों मे तुम , बाहों में तुम,
मैं जाऊ कहीं, तुम हो वहाॅं, तुम हो वही,
कैसे बताऊॅं मैं तुम्हें तुम मेरे लिए सब कुछ हो|”

हेही वाचा : “माझं अभिनेत्रीबरोबर…”, ‘बिग बॉस मराठी’ फेम प्रसाद जवादेचा लग्नाबाबत मोठा खुलासा

आता त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून यावर अमृता आणि प्रसादचे चाहते विविध कमेंट करत त्याची ही कविता आवडली असल्याचं सांगत आहेत.