मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहूगुणसंपन्न अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. अभिनयात त्याने आपली छाप पडलेली आहेच पण त्यासोबतच काव्यलेखन करतही त्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. तर आता त्याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

संकर्षणचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. सध्या तो ‘नियम व अटी लागू’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाबद्दलचे अपडेट्स तो चाहत्यांना सोशल मीडियावरून देत असतो. या त्याच्या नाटकाला सर्वत्र खूप चांगल्या प्रतिसादही मिळत आहेत. तर सध्या तो या नाटकाच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावर आहे. तिथून त्याने एक खास फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा : “मोठं व्हायची इतकी घाई…” संकर्षण कऱ्हाडेचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अमेरिकेच्या विविध भागांमध्ये या नाटकाचे प्रयोग होत आहेत. तर या निमित्ताने तो जवळपास महिनाभर त्याच्या कुटुंबीयांपासून लांब असणार आहे. त्यामुळे तो त्याच्या दोन्ही मुलांची व्हिडीओ कॉलवरून संपर्कात आहे. मुलांबरोबर केलेल्या अशाच एका व्हिडीओ कॉलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करून त्याने एक खास कॅप्शन लिहिली आहे. संकर्षणने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आणि त्याची लेक स्रग्वी व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “बाबा अमेरिकेहून गंमत आणणारे… जगातला सगळ्यात भारी व्हिडिओ कॉल. माय लव्ह. माय स्रग्वी.”

हेही वाचा : “विक्रम गोखले साहेबांनी चक्क मला…”; संकर्षण कऱ्हाडेने भावूक होत शेअर केल्या शूटिंगच्या आठवणी, पोस्ट व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आता संकर्षणच्या या गोड फोटोने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. त्यावर कमेंट करत सर्वजण त्याची ही पोस्ट आवडल्याचं सांगून स्रग्वीच्या निरागसपणाचं आणि त्यांच्यातल्या या बॉण्डिंगचं कौतुक करत आहेत.