अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. सोशल मिडियावर सक्रिय राहून तो त्याच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांना देत असतो. तर आता त्याचं कुटुंब एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलं आहे. ही कारण म्हणजे सिद्धार्थच्या आईने दुसरं लग्न केलं आहे.

आज सकाळी सिद्धार्थने सोशल मिडियावर त्याच्या आईच्या लग्नाचा फोटो शेअर करत ही बातमी सर्वांना सांगितली. सिद्धार्थची आई सीमा चांदेकर काल दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्या. थाटामतात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्याबद्दल सिद्धार्थने सोशल मिडियावरून सांगताच आता त्याबद्दल नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा : “मराठी दिसणं, मराठी बोलणं आणि…,” महाराष्ट्र दिनानिमित्त सिद्धार्थ चांदेकरने केलेली पोस्ट चर्चेत

सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या आईचा आणि त्यांच्या पतीचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं ! I love you आई! Happy Married Life.”

हेही वाचा : “…म्हणून मी गायक होऊ शकलो नाही,” व्हिडीओ पोस्ट करत सिद्धार्थ चांदेकरने दिलं स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याने ही पोस्ट शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. त्यांच्या या निर्णयाचं सर्वजण कौतुक करत आहेत. एकाने लिहिलं, “आज इन्स्टाग्राम ओपन केल्यावर समोर आलेली ही पहिली पोस्ट…किती सुंदर…खूप छान…माझ्या काकाचंसुद्धा त्याच्या मुलीने दुसरं लग्न लावून दिलं…या जगात आपलं कोणीतरी असणं… ही भावना किती छान आहे. मुलं असतातच पण त्यांना त्यांचा संसार,करिअर यामध्ये ते व्यस्त असतात. म्हणून जोडीदार हवा! खुप छान…!! खुप खुप अभिनंदन !” तर दूसरा नेटकरी म्हणाला, “सर्वात आधी आई आणि काकांचं अभिनंदन. याचबरोबर तुझंही अभिनंदन. तुम्ही जे लिहिलं ते वाचून डोळे भरून आले.” तिसरा नेटकरी म्हणाला, “खूप आवडली पोस्ट. इतकं सुंदर लिहिलं आहे. त्या दोघांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन.” तर आणखी एकाने लिहिलं, “अभिमानास्पद आणि भावूक वाटतंय. इतक्या मोठ्या बदलासाठी खूप धैर्य आणि त्या व्यक्तीबद्दल जिवापाड प्रेम असावं लागतं.” आता त्याची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे.