scorecardresearch

फॉलोवर्स कमी असल्याने ‘बाळूमामा’ फेम सुमीत पुसावळेला चित्रपटातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता, म्हणाला…

एका मुलाखतीत त्याने त्याच्याबरोबर घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार सांगितला.

sumeet

मराठी अभिनेता सुमीत पुसावळे गेले काही महिने त्याच्या कामामुळे खूप चर्चेत आहे. सध्या तो ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसतोय. त्याच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण तसं जरी असलं तरी आता सुमीतच्या बाबतीत एक धक्कादायक गोष्ट घडली आहे.

सुमीतने नुकतीच ‘ई टाईम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. सोशल मीडियावरील त्याच्या फॉलोवर्सच्या संख्येमुळे त्याला एका प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा त्याने केला.

आणखी वाचा : “तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही…” श्रेया बुगडेची प्रसिद्ध मराठी अभिनेत्यासाठी खास पोस्ट

सुमीत म्हणाला, “मी गेली अनेक वर्ष बाळूमामांची भूमिका साकारतो आहे. या भूमिकेमुळे मला प्रेक्षक ओळखतात. अनेकदा ते मला याच नावाने हाक मारतात. पण आता माझ्याबरोबर जे घडलं त्यामुळे मी खूप दुःखी झालो आहे. मी नुकतीच एका चित्रपटासाठी आणि म्युझिक व्हिडीओसाठी ऑडिशन दिली होती. या ऑडिशननंतर माझी निवडही करण्यात आली होती. पण त्यानंतर त्यांनी माझं सोशल मीडिया अकाउंट आणि त्यावरील माझे फॉलोवर्स पाहिले आणि त्यांनी थेट मला या प्रोजेक्टसाठी नकार दिला.”

हेही वाचा : Video : “तिकडून आली मोनिका आणि…” ‘बाळूमामा’ फेम अभिनेता सुमीत पुसावळेचा बायकोसाठी खास उखाणा, भरमंडपातील व्हिडीओ व्हायरल

पुढे तो म्हणाला, “या गोष्टीचा मला खूप धक्का बसला, मला खूप दुःख झालं. कारण त्यांनी या कारणाने मला नकार दिला. दुर्दैवाने आता कलाकाराचं भविष्य सोशल मीडिया ठरवायला लागलंय. तुम्ही किती चांगलं काम करता यापेक्षा तुमच्याकडे किती फॉलोवर्स आहेत हे जास्त महत्वाचं आहे. हे खूपच वाईट आहे. आता मी जास्तीत जास्त व्हिडीओ आणि रील सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आता हे गरजेचं आहे असं मला वाटू लागलंय. हे सोशल मीडिया प्रेशर नाहीये तर हे आता करावंच लागणार आहे.” सुमीतचं हे बोलणं आता खूप चर्चेत आलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 14:22 IST

संबंधित बातम्या