Video: “कोकणी माणसाचा आवाज दाबू नका…” सुव्रत जोशीचा व्हिडीओ चर्चेत

त्याचा हजरजबाबीपणा आणि त्याचा उत्स्फूर्तपणा हा सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे.

suvrat joshi

सुव्रत जोशी हा मराठी मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी अभिनेता म्हणून ओळखलं जातो. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याचा हजरजबाबीपणा आणि त्याचा उत्स्फूर्तपणा हा सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्या फोटोंवर त्याने लिहिलेल्या हटके किंवा मोठ्या कॅप्शन्स अनेकदा लक्ष वेधून घेत असतात. तर आता तो त्याच्या पोस्ट्सना इतक्या लांबलचक कॅप्शन्स का देतो हे त्याने सांगितलं आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

सुव्रतने नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली होती. तर याच पुरस्कार सोहळ्यात अंकिता वालावलकर या लोकप्रिय कंटेंट क्रिएटरशी मजेशीर संवाद साधला. यावेळी तिने गमतीत तो इंस्टाग्राम पोस्टवर लिहित असणाऱ्या लांब कॅप्शन्समागील कारण त्याला विचारलं. त्यावर सुव्रतनेही त्याच्या शैलीत मजेशीर उत्तर दिलं.

आणखी वाचा : Video: अखेर प्रतीक्षा संपली! सचिन व सुप्रिया पिळगावकर अनेक वर्षांनी एकत्र थिरकणार, ‘झी चित्र गौरव’तील व्हिडीओ व्हायरल

तो म्हणाला, “इंस्टाग्रामवरील माझ्या पोस्ट्सना मी मोठाल्या कॅप्शन्स लिहितो हे खरं आहे. याचं कारण असं की मला घरात बोलू दिलं जात नाही जास्त. त्यामुळे मला इंस्टाग्रामवर टाईप करावं लागतं. जेव्हा जेव्हा माझा आवाज दाबला गेला आहे तेव्हा तेव्हा मी इंस्टाग्राम वरून व्यक्त झालो आहे. त्यामुळे माझा आवाज दाबू नका आणि माझे आई-वडील कोकणी आहेत. कोकणी माणसाचा आवाज दाबू नका.”

हेही वाचा : “मला निवडल्याबद्दल…” सखी गोखलेने मानले पती सुव्रत जोशीचे आभार

आता त्यांचा हा गमतीशीर व्हिडीओ खूप चर्चेत आला असून यावर सुव्रतचे चाहते प्रतिक्रिया देत त्याचा हा मिश्किल अंदाज आवडला असल्याचं त्याला सांगत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 13:02 IST
Next Story
प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अजय देवगण-तब्बूचा ‘दृश्यम २’ लवकरच छोट्या पडद्यावर; वाचा कधी आणि कुठे पाहता येणार?
Exit mobile version