मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत ऋतुजा बागवे हिचा समावेश होतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. नुकताच तिने स्वतःचं पहिलं घर खरेदी केलं. यानिमित्त सुयश टिळकने तिच्यासाठी एक खास पोस्ट स्टोरी केली.

ऋतुजाने ठाण्यामध्ये नवीन घर घेतलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय नेहमी ती तिच्या या नवीन घराबद्दलचे अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत होती. तर कालच तिने तिच्या या नवीन घरात गृहप्रवेश केला. यावेळी मनोरंजन सृष्टीतील अनेक मित्र-मैत्रिणी तिच्या या नवीन घरी येऊन या शुभेच्छा दिल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे सुयश टिळक.

आणखी वाचा : Video: ऋतुजा बागवेने खरेदी केलं नवीन घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली…

नुकताच सुयश तिच्या नवीन घरी आला होता. यावेळी ऋतुजाबरोबर काढलेला एक फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आणि लिहिलं, “जेव्हा तुमची अनेक वर्षांपासून असलेली घट्ट मैत्रीण तिची स्वप्न पूर्ण करते, ज्याबद्दल आम्ही अनेक वर्ष बोलत आलो आहोत तेव्हा खूप छान वाटतं. फायनली… ऋतुजा तुझं खूप खूप अभिनंदन.”

हेही वाचा : Video: ऋतुजा बागवेने नवीन घरासाठी तयार करून घेतली खास नेमप्लेट, त्यावर लिहिलेल्या ‘या’ नावाने वेधलं सर्वांचं लक्ष, नेटकरी म्हणाले…

तर काल सुयश व्यतिरिक्त ऋतुजाच्या घरी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. स्पृहा जोशी, आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर, नंदिता पाटकर, करण बेंद्रे, अश्विनी कासार अशा अनेक कलाकारांनी तिच्या घरी जाऊन तिला या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.