‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित या मालिकेचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे. या मालिकेचं, यातील कलाकारांचं प्रेक्षक भरभरून कौतुक करताना दिसतात. आता या मालिकेतील एका अभिनेत्याने पोस्ट शेअर करत स्वामी समर्थांचे, मालिकेच्या टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

या मालिकेमध्ये अभिनेता विकास पाटील याची एन्ट्री झाली होती. या मालिकेत त्याने स्वामीसुत ही भूमिका साकारली. कालच या मालिकेच्या स्वामीसुत पर्वाचा शेवटचा भाग प्रसारित झाला. त्यामुळे आता विकास या मालिकेमध्ये दिसणार नाही. या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेताना विकासने खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा : “मी चंद्रपूरला गेलो असताना…,” स्वामी समर्थांची भूमिका साकारल्यावर मोहन जोशींना आला खास अनुभव, म्हणाले…

या मालिकेदरम्यान त्याचे काही फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “स्वामीसुत पर्वाचा शेवटचा भाग आज प्रदर्शित होतोय… खूप काही मिळालं या प्रवासात !! स्वामींचे कसे आभार मानावेत तेच कळत नाहीये. इतक्या कमी कालावधीत एक अखंड आयुष्य जगल्याचा अनुभव मिळाला, प्रत्येक पात्र तुम्हाला काही ना काही देऊन जात असतं. पण या पत्राने जगणं शिकवलं, गुरुंप्रती नितांत श्रद्धा ठेवणं शिकवलं, कठीण काळात जराही न डगमगता आपल्या गुरूंवर अढळ विश्वास ठेवून लढणं आणि पुढे जात राहणं शिकवलं, संसारात राहूनही वैराग्य कसं सांभाळावं हे शिकवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” ही आयुष्यभर पुरणारी शाश्वती मिळाली !!”

हेही वाचा : ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये स्वामींची भूमिका साकारणारा अभिनेता आहे तरी कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तुम्हाला, “माझ्या पूर्वपुण्याईनेच “स्वामीसुत” साकारायची संधी मिळाली.ही संधी मला दिल्याबद्दल वाहिनी आणि टीमचेचे मनापासून आभार. तुम्हा सर्व मायबाप प्रेक्षकांचे आभार ज्यांनी या पात्रावर भरभरून प्रेम केलं. पुन्हा भेटू लवकरच एका नव्या पात्रासोबत.” आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून त्यावर कमेंट करत त्याचे चाहते त्याचं काम आवडल्याचं सांगत आहेत.