अभिज्ञा भावे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत तिने प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली. कामाबरोबर असती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट अशा अनेक गोष्टी ती मनमोकळेपणाने शेअर करते. तर आता नुकतंच तिच्या आजीचं निधन झाल्याचं सांगत तिने त्यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली.

अभिज्ञा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. काल रात्री उशिरा तिने एक पोस्ट शेअर करून तिच्या आजीचं निधन झाल्याचं चाहत्यांना सांगितलं. याच बरोबर त्या पोस्टमधून तिने तिचं आजीबरोबर असलेलं नातंही उलगडलं.

आणखी वाचा : “…म्हणून तू माझ्याबद्दलच्या तुझ्या अपेक्षा वाढवू नकोस,” वल्लीने अनामिकासाठी केलेली पोस्ट चर्चेत

अभिज्ञाने तिचा आजीबरोबरचा एक फोटो शेअर करत लिहिलं, “माझ्या सर्वात खास आणि खोडकर मुलीला खुप प्रेम. मला माहीत आहे की तू ९३ वर्षं आनंदात जगलीत, तू सर्वांवर प्रेम केलंस, तुला सर्वांकडून खूप प्रेम मिळालं, तू आम्हा सर्वांना एकत्र ठेवलंस ! खोलीतलं ते तेजस्वी हसू, तुझ्या डोळ्यातील खोडकर चमक, तुझी हळुवार मिठी, तू मला पडद्यावर पाहिल्यावर तुझा चेहरा कसा उजळायचा!! ज्या मुलीला तिच्या ९० च्या दशकातही छान कपडे घालायला आवडायचे, जी ती कशी दिसते याकडे खूप लक्ष द्यायची. तिचं गॉगल्स, साड्या, खाऊ, स्वयंपाकघर, क्रोशाचे काम यावर असलेलं प्रेम खूप खास होतं! आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या एकमेव सर्वात मोठ्या चाहत्याला मिस करेन, जो माझ्याबद्दल नेहमीच पक्षपाती होता, आहे आणि राहील.”

हेही वाचा : मालिका संपताच वल्लीने केलं स्काय डायव्हिंग, अनुभव शेअर करत अभिज्ञा भावे म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तिने लिहिलं, “मी वचन देते की निर्भीडपणे ठाम मत व्यक्त करण्याचा तुझा स्वभाव, तुझी खेळकर वृत्ती, ९ पिढ्यांमध्ये सामावून जाण्याचा तुझा स्वभाव आणि गोष्टी स्वीकारायची तुझी क्षमता मी जन्मभर पुढे नेत राहीन! कारण शेवटी ते आपल्या रक्तातच आहे. तुझ्या सगळ्या आठवणी मनात जपून तुला माझा नेहमी अभिमान वाटेल अशा गोष्टी मी करेन याचं मी तुला वचन देते. तू होतीस, तू आहेस आणि तू नेहमीच माझी सुपर स्पेशल असशील. तू मला एक चांगली व्यक्ती बनवलंस आणि तुझ्यातील मुलाने मला एक चांगली आई बनवलं. तार्‍यासारखी तेजस्वीपणे चमकत राहा. माझी राजकुमारी प्रमिला भावे.” तर अभिज्ञाच्या या पोस्टवर तिचे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी कमेंट करत तिच्या आजीला श्रद्धांजली देत आहेत.