छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने १४ डिसेंबरला बॉयफ्रेंड शाहनवाजशी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नाचे फोटो शेअर करत देवोलिनाने ही बातमी चाहत्यांना दिली. परंतु, आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे देवोलिनाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

धर्माने मुस्लीम असलेल्या बॉयफ्रेंडबरोबर संसार थाटल्याने देवोलिना लग्न झाल्यापासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. धर्मावरुन ट्रोल करणाऱ्यांना आता देवोलिनाने सडेतोड उत्तर दिलं आहे. एका युजरने थेट देवोलिनाच्या मुलांच्या धर्मावर कमेंट केली आहे. देवोलिनाच्या वैवाहिक आयुष्याची खिल्ली उडवत एकाने “तुझी मुलं हिंदू असणार की मुस्लीम?” असा प्रश्न ट्विटरवर विचारला होता. युजरच्या या प्रश्नाला देवोलिनाने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे.

हेही वाचा>>“स्वघोषित मावळे माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा लावून…” केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

“माझी मुलं हिंदू असतील किंवा मुस्लीम, हे विचारणारे तुम्ही कोण आहात? एवढीच तुम्हाला मुलांची काळजी असेल, तर अनाथाश्रमाला भेट द्या. इथे खूप सारे अनाथाश्रम आहेत. तेथील मुलांना दत्तक घ्या आणि त्यांना तुमच्यानुसार धर्म व नाव द्या. माझा नवरा, माझी मुलं, माझा धर्म, माझे नियम..तुम्ही कोण?”, असा रिप्लाय देवोलिनाने दिला आहे.

हेही वाचा>>“…म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावंसं वाटतं”, मराठी अभिनेत्याने राज ठाकरेंसाठी केलेली पोस्ट चर्चेत

देवोलिनाने याबाबत आणखी एक ट्वीट केलं आहे. “हे तुम्ही माझा पती व माझ्यावर सोडून द्या. आम्ही बघून घेऊ. दुसऱ्यांच्या धर्माबद्दल गुगल रिसर्च करण्यापेक्षा स्वत:च्या धर्मावर लक्ष केद्रिंत करा आणि आदर्श व्यक्ती बना. तुमच्यासारख्या व्यक्तींकडून उपदेश व सल्ले घेण्याची मला गरज नाही”, असं तिने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> भगवी बिकिनी परिधान करुन अभिनेत्रीने समुद्रातच केला सेक्सी डान्स; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
devoleena bhatacharjee

देवोलिना ‘सात निभाना साथिया’ मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेतील गोपी बहू या पात्राने तिला लोकप्रियता मिळवून दिली. देवोलिनाचा पती शाहनवाज एक जिम ट्रेनर आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते.