scorecardresearch

“…म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावंसं वाटतं”, मराठी अभिनेत्याने राज ठाकरेंसाठी केलेली पोस्ट चर्चेत

मराठी अभिनेत्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी केली खास पोस्ट

abhijeet kelkar on raj thackeray
मराठी अभिनेत्याने राज ठाकरेंसाठी केलेली पोस्ट चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता अभिजीत केळकर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. अभिजीतने आजवर अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. समाजातील घडामोडींवरही तो त्याचं मत सोशल मीडियाद्वारे व्यक्त करताना दिसतो. सध्या अभिजीतने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावरुन परत येताच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. राज ठाकरे व फडणवीस भेटीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांणा उधाण आले होते. मुंबई महानगरपालिका व अन्य निवडणुकांच्या संदर्भात ही भेट असल्याचे तर्क-वितर्क लावले जात होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोकण महामार्गाच्या कामाबाबत राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली होती. कोकण महामार्गाचं काम वेगाने करण्याची आवश्यकता असल्याचं राज ठाकरेंनी या भेटीत फडणवीसांना सांगितलं.

हेही वाचा>>मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी पार पडला शाही विवाहसोहळा, मेहंदीचे फोटो व्हायरल

राज ठाकरेंनी कोकण महामार्गाच्या कामात स्वत: लक्ष घातल्यामुळे अभिजीत केळकरने त्यांचं कौतुक केलं आहे. राज ठाकरेंच्या या बातमीचा फोटो अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या पोस्टला त्याने “म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावसं वाटतं…धन्यवाद राजसाहेब” असं कॅप्शन दिलं आहे. अभिजीतने राज ठाकरेंसाठी केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

हेही वाचा>>हिरवा चुडा, मंगळसूत्र अन् टिकली; अक्षयाच्या “मिसेस जोशी” फोटोने वेधलं लक्ष

हेही वाचा>>Video: करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाशने दुबईत खरेदी केलं घर; स्विमिंगपूल, आलिशान बेडरुम अन्…; व्हिडीओत दिसली झलक

गेल्याच रविवारी (११ नोव्हेंबर) मुंबई-नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळी अभिजीतने “आमचं कोकणही समृद्धीची वाट बघतंय…गेली १२ वर्ष” अशा आशयाची पोस्ट केली होती. तेव्हाही त्याच्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-12-2022 at 10:10 IST