मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वीणा जगतापला ओळखलं जातं. आतापर्यंत ती अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये देखील ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती अनेकदा चर्चेत असते. तर आता नुकताच तिने तिच्या करिअरबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत असतानाच काही महिन्यांपूर्वी वीणाने प्रोफेशनल मेकअपचा एक कोर्स केला. याबद्दलची तिची पोस्ट सोशल मीडियावर पाहिल्यानंतर ती आता अभिनयातून कायमचा ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या. त्याबरोबरच मध्यंतरीच्या काळात ती कुठल्याही मालिकेत किंवा कार्यक्रमात दिसली नाही त्यामुळे तिने अभिनय क्षेत्राला कायमचा अलविदा केला असल्याचं अनेकांना वाटू लागलं. तर आता यावर तिने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : शिव ठाकरेचा त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल मोठा खुलासा, म्हणाला, “माझ्या आयुष्यात…”; वीणा जगतापच्या नावाचाही उल्लेख

‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी सहसा कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही. मी आजारी असेन, माझी दुसरी कामं सुरू असतील किंवा आलेल्या भूमिकेचे शूटिंग अगदीच बाहेरगावी असेल तरच मी तो प्रोजेक्ट नाकारते. नाहीतर मला विचारण्यात आलेली भूमिका मी करते. पण मध्यंतरी मी मेकअपचा कोर्स केल्यानंतर एका चॅनलने मी अभिनय क्षेत्रातून कायमचा ब्रेक घेणार अशी बातमी दिली. त्यानंतर ती बातमी काही इतर चॅनल्सने कॉपी केली. पण माझ्याबद्दल हे सगळं लिहिताना आम्हाला कोणीही एक फोन करून खरं खोटं विचारलं नाही. त्यामुळे आता मी अभिनय करणार नाही अशा बातम्या पसरल्या.”

हेही वाचा : “शिवबरोबर एकदा तरी बोल…” वीणाचा ‘कार’नामा पाहिल्यानंतर चाहत्यांच्या कमेंट, अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “पण मला आज स्पष्ट करायचं आहे की मी अभिनय सोडलेला नाही. मध्यंतरी मी ‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. त्यानंतरही मी ‘योगयोगेश्वर जयशंकर’ मालिकेत काम केलं. मी मध्यंतरी प्रोफेशनल मेकअप शिकले कारण तेव्हा माझ्याकडे थोडा मोकळा वेळ होता आणि आपल्या क्षेत्राशी संबंधित अभिनयाव्यतिरिक्तही आणखी काही गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत म्हणून मी अधून मधून नवनवीन काही शिकत असते. मी मध्यंतरी केलेला कोर्स आहे त्याचाच एक भाग आहे. त्यामुळे याचा अर्थ असा अजिबात नाही की मी अभिनय सोडून आता मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणार आहे.” तर आता वीणा जगतापचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.