मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये जुई गडकरीच्या नावाचाही समावेश आहे. जुईने छोट्या पदड्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तर सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेला आणि तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. जुईदेखील शूटिंगच्या व्यग्र शेड्युलमधून वेळ काढून चाहत्यांची बोलत असते. तर नुकताच तिने इन्स्टाग्रामवरून चाहत्यांची मनमोकळा संवाद साधला.

जुई सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. नुकतच तिने चाहत्यांची गप्पा मारण्यासाठी इन्स्टाग्राम स्टोरीवर आस्क मी क्वेश्चन सेशन घेतलं. यादरम्यान चाहत्यांनी तिला तिच्या कामाबद्दल तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विविध प्रश्न विचारले आणि जुई नही त्याची दिलखुलासपणे उत्तरं दिली.

आणखी वाचा : “खाली का बसला आहात?” नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेवर जुई गडकरीने दिलं चोख उत्तर, अभिनेत्रीची कमेंट चर्चेत

या सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला विचारलं, “तुमच्याकडे कुठल्या कुठल्या गाड्या आहेत?” चहा त्याच्या या प्रश्नाला जुई नाही मजेशीर उत्तर दिलं. ती तिचा एक व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “मोजता येणार नाहीत खरं तर. पण माझ्याकडे हॉटव्हिल्सच्या छोट्या छोट्या खूप गाड्या आहेत. त्याच्यातलीच रेंज रोव्हर आहे, त्याच्यातलीच लॅम्बोर्गिनी आहे… अशा माझ्याकडे छोट्या छोट्या खूप गाड्या आहेत.”

हेही वाचा : “शेतकरी मुलाशी लग्न करशील का?” जुई गडकरीने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर आता जुईने दिलेल्या या उत्तराकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं असून तिचं हे मजेशीर उत्तर तिच्या चाहत्यांना फारच आवडलं आहे.