मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून क्रांती रेडकर ओळखली जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर क्रांतीने मनोरंजनसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर क्रांती मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. निरनिराळे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते.

हेही वाचा- “काशीला जायच्या वयात… ” डान्सच्या व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं, म्हणाल्या “तुझ्या देवाने…”

क्रांतीनं २०१७ मध्ये सरकारी अधिकारी समीर वानखेडेंशी लग्नगाठ बांधली. क्रांती आणि समीर यांना झिया व झायदा अशा दोन जुळ्या मुली आहेत. क्रांती त्यांना प्रेमानं छबिल व गोदो अशी हाक मारते. सोशल मीडियावर क्रांती या दोघींचे अनेक व्हिडीओ शेअर करीत असते. दरम्यान, क्रांतीनं आपल्या इन्स्टाग्रामवर छबिल व गोदो यांचा एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या घरीच स्वत:चे पैसे तयार करताना दिसत आहेत. व्हिडीओ शेअर करीत क्रांतीनं कॅप्शनमध्ये लिहिलं “स्वत:चे पैसे बनवतायत घरी.”

व्हिडीओमध्ये क्रांतीच्या मुलीनं वहीवर ५० रुपयांच्या नोटेचं चित्र काढलं आहे. त्यावर त्यांनी गांधीजींचं चित्रही रेखाटलं आहे. क्रांती रेडकरच्या मुलींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्स करीत गोदोच्या चित्रकलेचं कौतुक केलं आहे. एकानं कमेंट्स करीत लिहिलं, ‘राज्य सरकारला विनंती आहे की हेच गांधींजी आम्हाला आमच्या सर्व नोटांवर हवे आहेत’. तर दुसऱ्यानं, ‘आज गांधीजी असते, तर काय वाटलं असतं त्यांना?’ अशी कमेंट केली आहे. आणखी एका नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं ‘RBI ला टक्कर देणार का गोदो? आम्हीही याच नोटा वापरणार’.

हेही वाचा- मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुस्तकांचं दुकान पाहून ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते गेले भारावून; म्हणाले, “दुर्दैवाने माझं वाचन…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रांती नेहमी आपल्या मुलींच्या करामतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करीत असते. काही दिवसांपूर्वीच छबिलनं तिचे स्वतःचे केस कापून घरटं बनवलं होतं. क्रांतीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.