अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळेचा विवाहसोहळा काही महिन्यांपूर्वी पार पडला. या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रचंड प्रेम प्रत्येक व्हिडीओ तसेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येतं. २८ ऑक्टोबरला शिवानीचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त कलाक्षेत्रामधील मंडळी तसेच घरातील मंडळींनीही तिला भरभरून शुभेच्छा दिल्या. लग्नानंतरचा तिचा हा पहिला वाढदिवस. हा वाढदिवस खास असावा म्हणून विराजसने तिला सरप्राईज दिलं. त्याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – अमृता सुभाष गरोदर नाही, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शेअर केला प्रेग्नेंसी किटचा फोटो, म्हणाली, “मी स्वतःला…”

शिवानीसाठी तिच्या सासूबाई म्हणजेच मृणाल कुलकर्णी यांनी खास पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी आपल्या सूनबाईंचं तोंडभरून कौतुक केलं होतं. आता विराजसने आपल्या कामामधून वेळ मिळताच चक्क ताज हॉटेलमध्ये बायकोला वाढदिवसाचं खास सरप्राईज दिलं. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे यादरम्यानचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये शिवानी फारच खूश दिसत आहे. केक कट करतानाचा तिचा आनंद अगदी पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना विराजसने हे सरप्राईज देण्यासाठी ज्यांनी त्याला मदत केली त्यांचे आभार मानले आहेत. तसेच शिवानीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा – “प्रिय शिवानी, तू आल्यापासून जाणवतंय…”; मृणाल कुलकर्णींची सूनबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

शिवानी सध्या तिच्या सुखी संसारामध्ये रमली आहे. सासूबाईंचंही तिच्यावर प्रचंड प्रेम आहे. इतकंच नव्हे तर मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या दोघींना ऑनस्क्रिन पाहणं रंजक ठरणार आहे.