‘खतरों के खिलाडी’ हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. गेली अनेक वर्षं हा कार्यक्रम चित्तथरारक स्टंट्सनी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाची १२ पर्वं पूर्ण झाली आहेत. तर आता सर्वांचं लक्ष या कार्यक्रमाच्या १३व्या पर्वाकडे लागलं आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री नायरा बॅनर्जी स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. पण या कार्यक्रमाचं शूटिंग सुरू होताच तिला दुखापत झाली आहे.

‘खतरों के खिलाडी’चं तेरावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. नुकतंच या पर्वाचं शूटिंग सुरू झालं. या पर्वाचं शूटिंग साउथ आफ्रिकेत होत आहे. यामध्ये हिंदी टेलिव्हिजनमधील अनेक आघाडीचे कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. आता अभिनेत्री नायरा बॅनर्जीही यात सहभागी झाली आहे. पण या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान तिला बरीच दुखापत झाल्याचं तिने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

आणखी वाचा : शिव ठाकरे ठरला ‘खतरों के खिलाडी’मधील सर्वात जास्त मानधन घेणारा स्पर्धक? एका एपिसोडसाठी मिळणार ‘इतकी’ रक्कम

नायरा म्हणाली, “आम्ही एका स्टंटचं शूटिंग करत होतो. त्या स्टंटमध्ये आमच्या अंगावर किडे सोडण्यात आले होते. माझ्या संपूर्ण शरीरावर किडे चढले आणि मला चावले. त्या किड्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना गंभीर दुखापत केली आहे. पण आता त्या जखमा बऱ्या होत आहेत. हा टास्क माझ्यासाठी एखाद्या भीतिदायक स्वप्नापेक्षा कमी नव्हता.”

हेही वाचा : ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये झळकणार उर्फी जावेद? कार्यक्रमाच्या टीमकडून विचारणा झाल्यानंतर अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तिचं हे बोलणं खूप चर्चेत आलं असून तिचे चाहते तिच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त करत आहेत. अनेकांनी तिला सोशल मीडियावरून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.