Net Worth of Priyanka Chahar Chaudhary: कलर्स वाहिनीवरील ‘नागिन’ हा लोकप्रिय टीव्ही शो आहे. आतापर्यंत या ‘नागिन’चे सहा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. विशेष म्हणजे ‘नागिन’च्या सर्व सीझन्सना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. आता लवकरच ‘नागिन’चा सातवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

रहस्यमयी, काल्पनिक, भावनिक, भयपट, प्रेम, बदला अशा विविध भावनांच्या छटा असलेल्या नागिन या टीव्ही मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. ‘नागिन’च्या सातव्या भागात प्रमुख भूमिका कोण साकारणार हे उघड झाले आहे. बिग बॉस १९ च्या मंचावर एकता कपूरने याबाबतचा खुलासा केला आहे. अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी ‘नागिन ७’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे नुकतेच उघड झाले.

प्रियांका चहर चौधरीची संपत्ती किती?

प्रियांका चहर चौधरी लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनेत्रीने याआधी उडारियाँ आणि बिग बॉस १६ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता प्रियांकाची एकूण संपत्ती किती ते जाणून घेऊ…

टीव्ही शो आणि मॉडलिंग यांतून अभिनेत्री पैसे कमावते. काही रिपोर्टनुसार, ती २०-२५ कोटींची मालकीण आहे. प्रियंका चहर चौधरीचा जन्म १३ ऑगस्ट १९९६ रोजी जयपूरमध्ये झाला.

२०१६ मध्ये मॉडेलिंगद्वारे तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती ‘हंजू’, मैं बेवफा आणि रफ्तार यांसह अनेक पंजाबी म्युझिक व्हिडीओंमध्येही दिसली. त्यानंतर तिने टीव्ही जगतात पदार्पण केले. प्रियांका २०१९ मध्ये ‘गठबंधन’मध्ये सेजल पारेख या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने ‘ये है चाहतें’मध्ये कीर्ती जैन ही भूमिका साकारली.

२०२१ मध्ये अभिनेत्रीला उडारियाँ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. प्रियांकाने त्या संधीचे सोने करीत, ‘उडारियाँ’तून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर ती बिग बॉसच्या १६ व्या सीझनमध्येदेखील सहभागी झाली होती. त्या सीझनमध्ये तिला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र, तिच्या खेळाने सर्वांची मने जिंकली. तिच्या स्पष्टवक्तेपणाचे आणि तिच्या खेळाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.

अभिनयाबरोबरच तिच्या खासगी आयुष्याचीदेखील मोठी चर्चा झाली. उडारियाँ मालिकेतील तिचा सहकलाकार व बिग बॉस १६ मधील स्पर्धक अंकित गुप्ता व तिच्या नात्याची मोठी चर्चा झाली. काही दिवसांपूर्वीच ते एकमेकांपासून विभक्त झाल्याचे समोर आले आहे. त्यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, प्रियांका आता ‘नागिन ७’मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.