हिंदी मालिकांमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणून अभिनेत्री रुबिना दिलैकला ओळखले जाते. ‘छोटी बहू’ या मालिकेमुळेच ती नावारुपाला आली. गेल्या काही दिवसांपासून रुबिना दिलैक गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर रुबिनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर शिक्कामोर्तब केले आहे.

रुबिना दिलैकने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने काही फोटो पोस्ट करत गरोदर असल्याची घोषणा केली आहे. या फोटोत तिचे बेबी बंप पाहायला मिळत आहे. या फोटोला तिने सुंदर कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “मला तिच्याबरोबर…”, अपूर्वा नेमळेकरने सांगितला तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली “आम्ही एकत्र…”

“जेव्हा आम्ही डेट करत होतो, तेव्हा आम्ही एकमेकांना वचन दिले होते की एकत्र जग फिरु. त्यानंतर मग लग्न झाले आणि आता आम्ही एक कुटुंब म्हणून असं करणार आहोत. लवकरच आम्ही एक छोट्या प्रवाशाचे स्वागत करु”, असे कॅप्शन रुबिनाने फोटोला दिले आहे.

रुबिनाने दिलेल्या या गुडन्यूजनंतर अनेक कलाकार तिचे अभिनंदन करत आहेत. रुबिना दिलैक ही सध्या तिचा पती अभिनव शुक्लाबरोबर कॅलिफोर्नियामध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. याचे काही फोटोही तिने शेअर केले होते. त्या फोटोवरुनच ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

आणखी वाचा : Photos: ‘लालबागचा राजा’ची पहिली झलक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या देखाव्याने वेधलं लक्ष

आणखी वाचा : नकारात्मक भूमिका असतानाही ‘प्रेमाची गोष्ट ‘मालिकेला होकार का दिला? अपूर्वा नेमळेकर म्हणाली, “बिग बॉसनंतर मी…”

दरम्यान रुबिनाने हिंदी मालिकांमध्ये काम करत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. तिने छोट्या पडद्यावर आदर्श सूनेची भूमिका साकारली होती. ‘छोटी बहू’ या मालिकेमुळेच ती नावारुपाला आली. हिंदी ‘बिग बॉस’मध्ये तर रुबिनाचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. याबरोबरच रुबिना ‘शक्ती’ आणि ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमातही झळकली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुबिना आणि अभिनव शुक्ला हे दोघेही २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या पाच वर्षांनी रुबिना आई होणार आहे. त्याबरोबरच रुबिनाने एका पंजाबी चित्रपटाचे शूटींगही पूर्ण केले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.