‘बड़े अच्छे लगते हैं’ व ‘कहानी घर-घर की’ या मालिकांमध्ये काम करून अभिनेत्री साक्षी तंवरने प्रेक्षकांची मनं जिंकली. साक्षीचे वडील सीबीआय अधिकारी होते. तिला आयएएस अधिकारी व्हायचं होतं, पण ती मात्र अभिनेत्री झाली. ५२ वर्षांची साक्षी तंवर अविवाहित असली तरी एका मुलीची आई आहे.
साक्षी तंवर मुळची राजस्थानमधील अलवर इथली. तिचे वडील राजेंद्र सिंह तंवर निवृत्त सीबीआय अधिकारी आहेत. साक्षीने दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि ती एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सेल्स ट्रेनी म्हणून काम करू लागली. काही काळ हॉटेलमध्ये काम केल्यावर साक्षीने १९९८ मध्ये ‘अलबेला सूर मेला’ द्वारे टीव्हीवर पदार्पण केलं होतं.
साक्षी तंवर व राम कपूरचा किसिंग सीन
२००० मध्ये साक्षी एकता कपूरच्या लोकप्रिय शो ‘कहानी घर घर की’ मध्ये पार्वती अग्रवालच्या भूमिकेत झळकली. या मालिकेने साक्षीला खूप लोकप्रियता मिळवून दिली. नंतर तिने इतर मालिकांमध्ये काम केलं. २०११ ते २०१४ या काळात ‘बडे अच्छे लगते हैं’ मध्ये ती राम कपूरबरोबर मुख्य भूमिकेत होती. प्रिया कपूर म्हणून साक्षीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. राम व साक्षी यांनी या मालिकेत तब्बल १७ मिनिटांचा एक रोमँटिक सीन दिला होता. यात राम व साक्षीचा किसिंग सीनही होता. त्यांच्या या सीनची खूप चर्चा झाली होती.
साक्षी तंवरचे चित्रपट
साक्षीने ‘कॉफी हाऊस’, ‘आतंकवादी अंकल’, ‘शोर से शुरूआत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, पण ते फ्लॉप ठरले. तिचा एकमेवर ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणजे ‘दंगल’ होय. साक्षीने बॉलीवूडच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमात आमिर खानच्या पत्नीची भूमिका केली होती. दंगलने जगभरात २००० कोटी रुपये कमावले होते.
राम कपूरने केलेलं साक्षीचं कौतुक
साक्षीचं राम कपूरने कौतुक केलं होतं. तिच्या सहा पिढ्या बसून खातील इतका पैसा साक्षीने कमावला आहे. साक्षी साधं आयुष्य जगते, तिला फार महागड्या वस्तूंची आवड नाही. ती विचारपूर्वक गुंतवणूक करते आणि त्यातून नफा मिळवते, असं राम कपूरने म्हटलं होतं.
साक्षी तंवरने दत्तक घेतली मुलगी
साक्षी तंवर आता ५२ वर्षांची झाली आहे, पण तिने लग्न केलं नाही. तिला एक मुलगी आहे. साक्षीने सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये ४५ व्या वर्षी एक मुलगी दत्तक घेतली. तिच्या मुलीचं नाव दित्या आहे. साक्षी व तिची लेक दोघीही मुंबईत राहतात.