‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी स्वानंदीने होणाऱ्या नवऱ्यासह फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. रिलेशनशिपबाबत घोषणा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा साखरपुडा आज थाटात संपन्न झाला आहे.

हेही वाचा : ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’, ‘सेक्रेड गेम्स’ गाजवणाऱ्या नवाजुद्दिन सिद्दिकीची पहिली कमाई किती होती माहिती आहे का?

स्वानंदीच्या घरी गेल्या दोन दिवसांपासून साखरपुड्याची जय्यत तयारी सुरु होती. आज इन्स्टाग्राम फोटो शेअर करत अभिनेत्रीने साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली आहे. “…आणि आम्ही बंधनात अडकलो”, असे कॅप्शन देत स्वानंदीने आशिषबरोबर फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : “१५० बायका ‘बाईपण भारी देवा’साठी भांडल्या…” सुकन्या मोनेंनी सांगितला राजस्थानातील किस्सा; म्हणाल्या, “मला ई-मेल…”

साखरपुडा समारंभात स्वानंदीने पेस्टल पिस्ता रंगाची साडी नेसली होती. स्वानंदीच्या साडीच्या रंगाला मॅचिंग असे जॅकेट आशिषने परिधान केले होते. अभिनेत्रीने साखरपुड्याची घोषणा केल्यावर मराठी कलाविश्वातील कलाकारांनी स्वानंदी आणि आशिषवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. समीर चौघुले, अमृता खानविलकर, नम्रता संभेराव, शरयू दाते, श्रेया बुगडे, यशोमन आपटे इत्यादी कलाकार मंडळींनी कमेंट करत दोघांचेही कौतुक केले आहे.

हेही वाचा : “मुख्यमंत्र्यांना सलाम!” इर्शाळवाडी दुर्घटनेतील एकनाथ शिंदेंचे काम पाहून हार्दिक जोशीकडून स्तुतिसुमने, म्हणाला…

View this post on Instagram

A post shared by Swanandi Tikekar (@swananditikekar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्वानंदी टिकेकर ही अभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. छोट्या पडद्यावरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, “अगं अगं सुनबाई…” या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच स्वानंदीचा होणार नवरा आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे. लवकरच दोघेही विवाहबंधनात अडकणार आहे.