कलाकारांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून किंवा विविध मुलाखतींच्या माध्यमातून त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी चाहत्यांची शेअर करत असतात. आता अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

अभिनेत्री तितिक्षा तावडे सध्या ‘सातव्या मुलीची सातवी गोष्ट’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेमुळे तिला नवी ओळख मिळाली आहे. याचबरोबर तिचा चाहतावर्गही वाढला आहे. आता ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही वर्षांपूर्वी एका मुलाने तिला त्याच्याबरोबर कॉफी प्यायला येण्यासाठी विचारलं होतं आणि त्यावर ती तिथेच जोरजोरात रडायला लागली असं तिने सांगितलं आहे.

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते’मधील एंट्रीआधीच आशुतोषची बहीण चर्चेत, अभिनेत्रीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत नेटकरी म्हणाले…

पहिल्या प्रपोजचा किस्सा सांगत तितिक्षा म्हणाली, “मी मुंबई सोडून गोव्याला शिक्षणासाठी गेले आणि तेव्हा पहिल्यांदा घरच्यांपासून वेगळी राहत होते. तेव्हा मला आमच्या कॉलेजमधील एका सीनियरने कॉफी डेटसाठी विचारलं. एकदा तो मला मेसमध्ये भेटला आणि मला म्हणाला की मला भेट, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. मी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये संध्याकाळी त्याला भेटले. तेव्हा त्याने मला विचारलं की तुला माझ्याबरोबर कॉफी प्यायला यायला आवडेल का? त्यावर मी तिथेच अक्षरशः भोकाड पसरलं होतं.”

हेही वाचा : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं टपरीवरील चहावाल्याच्या मुलावर होतं क्रश, खुलासा करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “मला रडताना पाहून आमच्या कॉलेजमधील काही सीनियर मुली माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की तो तुला त्रास देतोय का? त्यावर मी त्यांना म्हणाले होते की नाही. तो मला त्रास देत नाहीये पण त्याने मला कॉफीसाठी विचारलं. त्या क्षणी त्याने माझी छेड काढल्यासारखंच मला वाटलं होतं. कारण मुंबईत मी घरच्यांबरोबर खूप सुरक्षित वातावरणात होते आणि इथे थेट त्याने मला कॉफीसाठी विचारणं हा माझ्यासाठी कल्चरल शॉक होता. त्या मुलानेही मला नंतर सॉरी म्हटलं.” आता तितिक्षाचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे.