अभिनेत्री उर्मिला निंबाळकर बऱ्याच काळ मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरी नेहमीच चर्चेत असते. तिला आता एक लोकप्रिय युट्यूबर म्हणून ओळखलं जातं. दर शुक्रवारी उर्मिला तिच्या युट्यूब चॅनेलवरून लाइफस्टाइल, मेकअप, ट्रॅव्हल अशा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ शेअर करत असते. कधी कधी ती काही गंभीर विषयांवरही परखड मत व्यक्त करत असते.

हेही वाचा – “‘या’ अभिनेत्यामुळे मी आता दगडाबरोबरही रोमान्स करू शकते”; मराठमोळ्या अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

उर्मिला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना नेहमी सकारात्मक राहण्याचा सल्ला देत असते. शिवाय तिच्या बाळाबाबतीच माहिती देत असते. अशा या बहुचर्चित उर्मिलाला ‘बिग बॉस मराठी’मध्ये पाहण्याची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. आता याच विषयी तिनं मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा – “मराठी चित्रपटाबद्दल एक मोठा भ्रम आता मोडला”; केतकी माटेगावकरचं विधान, म्हणाली, “कोण म्हणतं ….”

कालच्या युट्यूब व्हिडीओमधून उर्मिलाने चाहत्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी तिला एका चाहत्याकडून विचारलं गेलं की, ‘बिग बॉस मराठीमध्ये जायची संधी मिळाल्यास जाणार का?’ यावर उर्मिला म्हणाली की, “मला खरंतर ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाण्याची संधी मिळाली होती. मला दुसऱ्या पर्वासाठी बोलावलं होतं. खूप छान आहे, त्यांनी मला संधी दिली. पण मी अजिबात तिथे जाऊ शकत नाही आणि बिग बॉसमधला प्रवास करू सुद्धा शकत नाही. माझं इथे खूप बरं चाललं आहे. मला अजिबात बिग बॉसमध्ये जायची इच्छा नाहीये. त्यामुळे मी त्यांना नाही सांगितलं.”

हेही वाचा – “…यासाठी मराठी माणसानं महाराष्ट्र सोडला पाहिजे”; ‘सुभेदार’ फेम अजय पुरकरांचं वक्तव्य, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर तिला दुसऱ्या चाहत्यानं विचारलं की, ‘तुझा कधी ब्रेकअप झालाय का?’ याविषयी उर्मिला म्हणाली, “हो. फक्त ब्रेकअप नाही तर मला सोडू दिलं होतं.” अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तर उर्मिलानं तिच्या नुकत्याचं व्हिडीओमधून दिली आहेत. लवकरच तिच्या युट्यूब चॅनेलचे १ मिलियन सब्सक्रायबर्स होणार आहेत.