Sankarshan Brother Adhokshaj Karhade : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच काही ना काही रंजक गोष्टी घडताना दिसतात. ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेला सुद्धा गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सूर्या दादाशी नेहमीच कठोरपणे वागणारे डॅडी सध्या त्याच्याशी एकदम चांगलं वागत असल्याचा सीक्वेन्स मालिकेत सुरू आहे. पण, हा सगळा निव्वळ बनाव असून त्यांचा खरा चेहरा लवकरच उघड होणार आहे.

सूर्याची बहीण तेजूचं लग्न आपल्याच मुलाशी व्हावं अशी डॅडींची इच्छा असते. यासाठी ते एक नवीन डाव खेळणार आहेत. डॅडी स्वत: तेजुसाठी एक स्थळ शोधून आणणार आहेत. या स्थळाला सूर्या स्वत:च विरोध करेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा डाव आहे. यासाठी मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. आता मालिकेत एन्ट्री घेणारा हा नवीन अभिनेता कोण असा प्रश्न प्रोमो पाहून अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. अखेर त्याचं उत्तर आता समोर आलं आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा : अंकिताचे फोटो सूरजच्या अकाऊंटवरून झाले Delete! चाहते नाराज; कोकण हार्टेड गर्ल म्हणाली, “यातून काढता पाय…”

संकर्षणने आपल्या भावासाठी स्वत: पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. संकर्षणच्या भावाचं नाव अधोक्षज कऱ्हाडे असून तो मालिकेत पिंट्या उर्फ समीर निकम ही भूमिका साकारणार आहे.

संकर्षण कऱ्हाडेची भावासाठी पोस्ट

संकर्षण आपल्या भावासाठी पोस्ट शेअर करत लिहितो, “रोज सकाळी ५.३० वाजता उठायचं…जिम ट्रेनरला एकवेळ व्यायामाचा कंटाळा आला तर त्याच्या वाट्याचे डंबेल्स उचलून घरी यायचं. आल्यावर कसल्या कसल्या स्मुदी, शेक वगैरे प्यायचं…ठरल्यावेळीच, ठरलेलंच जेवायचं आणि ठरल्यावेळीच झोपायचं… माझ्याशी…माझ्या वागण्याशी आणि माझ्या सवयींशी एकही गोष्टं न जुळणारा हा माझा सख्खा भाऊ… एक आवड आमच्यात समान ‘अभिनयाची’. सतत धडपडत, कामाच्या शोधात असतो. त्याला एक छान संधी मिळाली आहे ‘झी मराठी’वर… पिंट्या उर्फ समीर निकम हे पात्र साकारण्याची… आज रात्री पासून ८.३० वाजता ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका नक्की बघा. अधोक्षज तुला खूप शुभेच्छा…तुमचेही आशीर्वाद, शुभेच्छा असु द्या…”

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर मधुभाऊंची जेलमधून होणार सुटका! अर्जुनने कोर्टात घेतली मोठी जबाबदारी, पाहा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संकर्षणने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळींनी अधोक्षजसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता तो साकारत असलेल्या पिंट्याच्या येण्याने मालिकेत काय वळण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.