scorecardresearch

अमिताभ बच्चन यांच्या मेसेजने उडाली विकी कौशलची झोप; ‘केबीसी’ कार्यक्रमात अभिनेत्याने केला खुलासा

केबीसी कार्यक्रमात आजकाल कलाकारदेखील उपस्थित असतात

अमिताभ बच्चन यांच्या मेसेजने उडाली विकी कौशलची झोप; ‘केबीसी’ कार्यक्रमात अभिनेत्याने केला खुलासा
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सिनेसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. दमदार अभिनय आणि हटके भूमिकांसाठी विकीला खास ओळखले जाते. अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणून ओळखले जाते. विकी कौशल हा सध्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘मसान’ या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली, यातील भूमिकेचे कौतुक झाले. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील त्याचे कौतुक केले होते.

केबीसी कार्यक्रमात स्पर्धकांच्या बरोबरीने कधी कधी कलाकार हजेरी लावत असतात. नुकतीच या कार्यक्रमात विकी कौशल कियारा अडवाणी या कार्यक्रमात आले होते. तेव्हा विकीने बच्चनजींबद्दलची आठवण सांगितली. तो असं म्हणाला, “एके दिवशी सकाळी माझ्या वडिलांनी मला बोलवले आणि त्यांनी फोन दाखवला ज्यावर तुम्ही मेसेज केला होतात. मी वडिलांचा फोन घेऊन तो मेसेज माझ्या मोबाइलवर टाईप करून घेतला. मी रात्रभर हा विचार करत होतो की अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या संपूर्ण दिवसात काही क्षण माझा विचार केला. हा माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता असं मी मानतो.” अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Ved Movie Review: अनोख्या प्रेमकहाणीला ॲक्शनची जोड, स्वतःचं वेगळेपण जपणारा ‘वेड’

विकी कौशल व्यतिरिक्त, मसानमध्ये संजय मिश्रा, ऋचा चढ्ढा आणि श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका होत्या ज्यात पंकज त्रिपाठीच्या पाहुणे कलाकार म्हणून होते. २०१५मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता.

दरम्यान विकी कौशल, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर यांचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट आता डिस्ने हॉटस्टारवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते. प्रदर्शित होऊन अवघ्या काही दिवसातच हा चित्रपट ओटीटी माध्यमावर सुपरहिट ठरला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 13:24 IST

संबंधित बातम्या