Aishwarya And Avinash Narkar Dance Video : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी आतापर्यंत विविध मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता सध्या या दोघांची जोडी सोशल मीडियावर सक्रिय असते. काळानुसार नवनवीन गोष्टी, तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे हा विचार करून, तसेच ऐश्वर्या व अविनाश या दोघांनाही डान्सची प्रचंड आवड असल्याने हे दोघेही रील्स व्हिडीओ बनवत असतात. त्यांच्या रील्सला इन्स्टाग्रामवर तुफान प्रतिसाद मिळतो. सध्या या जोडप्याने शेअर केलेला एक नवीन डान्स व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे. ऐश्वर्या व अविनाश नेहमीच नवीन किंवा व्हायरल गाण्यांवर डान्स व्हिडीओ बनवतात. या जोडीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी, दाक्षिणात्य अशा विविध भाषांमधील गाण्यांवर या दोघांनी यापूर्वी डान्स केले आहेत. आता नुकताच नारकर जोडप्याने एका कन्नड गाण्यावर डान्स केला आहे. हेही वाचा : Bigg Boss Marathi : आर्याचं एकतर्फी प्रेम; वैभव-इरिनाला एकत्र पाहून ढसाढसा रडली! नेटकरी म्हणाले, “अगदी बालिशबुद्धी…” 'द्वापारा' हे कन्नड भाषेतील गाणं सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. जसकरण सिंग आणि अर्जुन जान्या यांनी हे गाणं गायलेलं आहे. 'कृष्णम प्रणया सखी' या अल्बममधील 'द्वापारा' गाण्यावर हूकस्टेप करत अलीकडच्या काळात सगळेच हौशी नेटकरी रील्स व्हिडीओ बनवत आहेत. नारकर जोडप्याला सुद्धा या गाण्याची भुरळ पडली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ( Aishwarya And Avinash Narkar ) हेही वाचा : Video : लग्नानंतर सहा वर्षांनी सेलिब्रिटी कपल होणार आई-बाबा; ‘असं’ पार पडलं डोहाळे जेवण, पाहा व्हिडीओ नारकर जोडप्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक अविनाश व ऐश्वर्या ( Aishwarya And Avinash Narkar ) यांनी पारंपरिक लूक करत या कन्नड गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. "तुमची जोडी म्हणजे खरंच एक नंबर आहे", "खरंच एक नंबर जोडी आहे मालिकेपासून तुम्हाला पाहतेय", "जगातील सुंदर जोडी", "एव्हरग्रीन कपल", "तुम्ही दोघेपण खूप छान आहात… आयुष्य असंच आनंदाने जगलं पाहिजे…ग्रेट ताई खरंच" अशा कमेंट्स युजर्सनी या व्हिडीओवर केल्या आहेत. हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘या’ आठवड्यात नॉमिनेट झाले घरातील ‘हे’ ६ सदस्य! एका ट्विस्टमुळे झाली सर्वांची मोठी कोंडी दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश ( Aishwarya And Avinash Narkar ) यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेते नुकतेच 'डंका' चित्रपटात झळकले होते. तर, ऐश्वर्या नारकर येत्या काही काळात 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून एक्झिट घेणार आहेत.