ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांची जोडी मराठी मनोरंजनविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर नारकर जोडप्याच्या रील्स व्हिडीओची सर्वाधिक चर्चा रंगते. ट्रेडिंग असणाऱ्या लोकप्रिय गाण्यांवर हे दोघेही भन्नाट रील्स बनवतात. ऐश्वर्या व अविनाश नारकर यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

नारकर जोडप्याने शाहरुख खान व माधुरी दीक्षितच्या ९० च्या दशकातील लोकप्रिय गाण्यावर डान्स केला आहे. ‘दिल तो पागल हैं’ या १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यामध्ये शाहरुख-माधुरीवर चित्रित झालेल्या लोकप्रिय “डोलना…” गाण्यावर नारकर जोडपं थिरकत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “संजय दत्तबरोबर काम करण्याची…”, रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितला ‘मुन्नाभाई MBBS’चा अनुभव, म्हणाल्या…

ऐश्वर्या आणि अविनाश नारकरांनी “डोलना…” या गाण्यावर सुंदर असा डान्स केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने निळ्या रंगाची साडी, तर अविनाश यांनी बायकोच्या साडीला मॅचिंग असं टी-शर्ट परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासांतच यांच्या या व्हिडीओला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.

हेही वाचा : राज्य सरकारच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंबरोबर दिसले नाना पाटेकर, 12th Fail फेम अधिकारी श्रद्धा जोशीही होत्या उपस्थित

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या व्हिडीओवर मराठी कलाविश्वातील कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. तितीक्षा तावडे, सुरुची अडारकर, अश्विनी कासार या अभिनेत्रींनी या व्हिडीओवर कमेंट्स करत नारकर जोडप्याचं कौतुक केलं आहे.