अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. दोघं सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्यामुळे अनेकदा ट्रोलही होतात. पण या ट्रोलर्सना दोघं सडेतोड उत्तर देतात. नुकताच दोघांनी बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या ट्रेडिंग गाण्यावर जबरदस्त केला. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीसह अविनाश नारकर, अश्विनी कासार डान्स करताना दिसत आहेत. तिघंही शाहिद कपूरच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहेत. या गाण्याची हूकस्टेप ऐश्वर्या, अविनाश व अश्विनी कासार करताना दिसत आहेत.

हेही वाचा – अलीकडेच सरकार दरबारी कौतुक झालेल्या ‘या’ मराठी अभिनेत्याची ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात वर्णी, म्हणाला, “ज्या लोकांना…”

ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहतीने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली की, अविनाश सरांची रील बघून आधी मला राग यायचा. असे चाळे शोभतं नाही, असं वाटायचं. पण आता मी एन्जॉय करते. माझ्यासारखे खूप असतील ज्यांना राग येत असेल पण दुसऱ्या नजरेने बघा. तुम्हाला पण अविनाश सरांचे रील्स आवडतील. तर दुसऱ्या चाहतीने लिहिलं आहे, “नारकर यांनी शाहिद कपूरप्रमाणेच छान डान्स केला.” तसेच तिसऱ्या चाहत्याने लिहिलं आहे, “मराठी स्वीट जोडा.”

हेही वाचा – प्रथमेश परबच्या होणाऱ्या बायकोने लग्नाअगोदर दिलं खास सरप्राईज, अभिनेता म्हणाला, “प्रेमात थोडं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. तर ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत दिसत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे.