आजकाल ९०च्या दशकातील मराठीतील एक कपल नेहमी चर्चेत असतं. हे कपल म्हणजे नारकर कपल. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सतत चाहत्यांच्या मनोरंजनसाठी शेअर करत असतात. पण यामुळे ते कधीकधी ट्रोलही होतात. मात्र याला दोघंही सडेतोड उत्तर देतात. नुकताच ऐश्वर्या नारकर यांनी दोघांचा व्हिडीओ शेअर करत नवं वर्षाच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्या पती अविनाश यांच्याबरोबर डान्स करताना दिसत आहेत. जबरदस्त डान्स करत दोघं नवं वर्षाचं स्वागत करत आहेत. ऐश्वर्या यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिल आहे, “२०२४चं स्वागत आहे. चिंता, गैरसमज, वेदना, दुःख सर्व काही विसरा…फक्त सकारात्मक आणि आशावादी राहा…सर्व काही परिपूर्ण होणार आहे…तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…”

हेही वाचा – शिव ठाकरेने मुंबईत घेतलं आलिशान घर, ‘झलक दिखला जा सीझन ११’मध्ये केला खुलासा, म्हणाला, “मला वाटायचं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अविनाश हे ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ या मालिकेत पाहायला मिळत आहेत. तर ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे.