अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या नारकर. चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत त्या विरोचक या खलनायिकेची भूमिका साकारत आहेत.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अनेकदा सेटवरची धमाल-मस्ती, डान्सचे व्हिडीओ त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. ऐश्वर्या नारकर यांचा पती अविनाश यांच्याबरोबरच्या रिल्स अनेकदा चर्चेत असतात.

हेही वाचा… VIDEO: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यातून भारतात कुटुंबासह परतला शाहरुख खान; पापाराझींना पाहून आर्यन खान…

चाहत्यांना नेहमीच त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या आय़ुष्याबद्दल जाणून घ्यायची उत्कंठा असते. चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर मला प्रश्न विचारा (Ask me Anything) अशी स्टोरी शेअर केली आहे. यानिमित्ताने ऐश्वर्या यांनी चाहत्यांना प्रश्न विचारण्यास सांगितले. यावर प्रतिक्रिया देत ऐश्वर्या नारकर यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न वितारले, तर काहींनी त्यांना अभिनय क्षेत्रासंबंधित प्रश्न विचारले.

हेही वाचा… ठरलं तर मग: व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार सुरू अन् मिळणार साक्षीविरोधात नवा पुरावा; चैतन्य खेळणार नवी खेळी, पाहा प्रोमो

यादरम्यान ऐश्वर्या नारकर यांना एका चाहत्याने एक प्रश्न विचारला. चाहत्याने प्रश्न विचारत लिहिलं, “लग्नानंतर कोणी प्रपोज केलं आहे का? ज्याला माहीत नसेल की तुम्ही विवाहित आहात…” यावर ऐश्वर्या नारकर यांनी उत्तर देत लिहिलं, “सगळ्यांना माहितंय की माझं लग्न झालंय.”

यानिमित्ताने अनेकांनी ऐश्वर्या नारकर यांना त्यांच्या फिटनेसबद्दल, स्किन केअर रुटीनबद्दल तसेच केसांच्या काळजीसंबंधित अनेक प्रश्न विचारले. अभिनेत्रीने अगदी वेळात वेळ काढून सगळ्याच प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन चाहत्यांना खूश केलं.

हेही वाचा… “अतिशय वेगळा असा आळस…”, ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने शेअर केला गणीबरोबर ‘खास’ व्हिडीओ; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत सध्या अभिनेत्री खलनायिकेची भूमिका साकारत आहे. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे, तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.