Aishwarya Narkar New Home First Look : नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकरांना ओळखलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. त्या सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. नुकतीच अभिनेत्रीने त्यांच्या चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) इन्स्टाग्रामवर पोस्ट, स्टोरी, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या फिटनेसची देखील सर्वत्र चर्चा असते. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीने नुकतीच आपल्या चाहत्यांना नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी दिली आहे. नव्या घरातून दिसणाऱ्या सुंदर अशा दृश्याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने नवीन घर खरेदी केल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा : Video : आज आई-बाबा असते तर…; पुरस्कार मिळताच पालकांच्या आठवणीत ‘शिवा’ला अश्रू अनावर; मुक्ता बर्वेने दिला धीर

ऐश्वर्या नारकरांनी घेतलं नवीन घर

नव्या घराची पहिली झलक शेअर करत ऐश्वर्या नारकरांनी ( Aishwarya Narkar ) या व्हिडीओला “आनंदाचा नवीन रस्ता… आमचं नवीन घर” असं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय घर कसं सजवणार याची झलक देखील अभिनेत्रीने तिच्या व्हिडीओमध्ये दाखवली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये शिवाली परब, भूषण प्रधान, अदिती द्रविड, अश्विनी महांगडे, रुपाली भोसले, रोहित माने, मंगेश देसाई अशा अनेक कलाकारांनी नवीन घर घेतल्याचं पाहायला मिळालं. या यादीत आता ऐश्वर्या नारकरांचं नाव देखील जोडलं गेलं आहे. सध्या अभिनेत्रीचे चाहते त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : “दंगलने २ हजार कोटी कमावले अन् आम्हाला फक्त…”, बबिता फोगटचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या वडिलांनी…”

हेही वाचा : दिवाळी पार्टीत रितेश देशमुखच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, बायकोसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “Green Flag…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Aishwarya Narkar
ऐश्वर्या नारकरांची इन्स्टाग्राम स्टोरी ( Aishwarya Narkar new home )

दरम्यान, ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारत आहेत. याशिवाय त्या सोशल मीडियावर विविध रील्स शेअर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.