‘या सुखांनो या’, ‘लेक माझी लाडकी’ या गाजलेल्या मालिकांमधून अभिनेत्री ऐश्वर्या नारकर घराघरांत लोकप्रिय झाल्या. मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं. नुकताच ८ डिसेंबरला ऐश्वर्या नारकरांनी त्यांचा ५३ वा वाढदिवस साजरा केला. या वयात सुद्धा त्या त्यांच्या फिटनेसकडे उत्तमप्रकारे लक्ष देतात. सोशल मीडियावर सक्रिय राहून ऐश्वर्या त्यांच्या चाहत्यांना वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यातील अनेक अपडेट्स देत असतात. नारकर जोडप्याने अलीकडेच एका खास जागेला भेट दिली होती. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ऐश्वर्या नारकर नुकत्याच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पाणवठा’ या अपंग प्राण्यांच्या अनाथाश्रमात गेल्या होत्या. यावेळी त्यांचे पती अविनाश नारकर देखील त्यांच्याबरोबर उपस्थित होते. या अनाश्रमातील हृदयस्पर्शी व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “मी खूप विसरभोळी अन् तो…”, अनुष्का शर्माने भर कार्यक्रमात सांगितलेलं विराट कोहलीशी लग्न करण्याचं कारण

“आज या सुंदर जागेला भेट दिल्यावर मी खरंच धन्य झाले. डॉ. अर्चना जैन व डॉ. गणराज जैन हे दोघंही याठिकाणी असलेल्या प्राण्यांची खूप काळजी घेतात. तसेच येथील अपंग प्राण्यांना नवं आयुष्य देण्याचा हे डॉक्टर प्रयत्न करतात. प्राण्यांच्या पुनर्वसनासाठी देखील याठिकाणी अथक प्रयत्न केले जातात. नि:स्वार्थ हेतूने केलेल्या या दोघांच्या कार्याला माझा सलाम!” असं कॅप्शन ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओ पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : अर्जुनच्या वाढदिवसामुळे निर्माण होणार नवीन गोंधळ, काय असेल साक्षी शिखरेचा पुढचा डाव? पाहा प्रोमो…

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणतंही महागडं हॉटेल किंवा पर्यटनस्थळाची निवड न करता अभिनेत्रीने अशा सुंदर जागी भेट दिल्याने सध्या ऐश्वर्या व अविनाश नारकर या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “खूप सुंदर मॅडम”, “ग्रेट वर्क” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर केल्या आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या त्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत खलनायिका रुपाली ही भूमिका साकारत आहेत.