अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्ष त्या विविध नाटक मालिका चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावरून त्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. अनेकदा त्यांना त्यांच्या पोस्टमुळे ट्रोलही केलं जातं. पण आता ट्रोल करणाऱ्यांना त्यांनी चोख उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांचे अनेक मजेशीर रील्स पोस्ट करत असतात. आतापर्यंत अनेकदा त्या रील्समुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. तर आता अशांना ऐश्वर्या नारकर यांनी एका नवीन रीलमधून उत्तर दिलं.

आणखी वाचा : “मी पहिल्यांदा शॉर्ट्स घातली आणि…” ऐश्वर्या नारकर यांनी रंगलेल्या चर्चंबाबत केलं भाष्य

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच एक रील पोस्ट केलं. यामध्ये त्या आणि अभिनेत्री अश्विनी कासार गाडीत बसून ‘अनॲव्हेलेबल’ या गाण्यावर हातवारे करून नाचताना दिसत आहेत. तर या व्हिडीओमध्ये लिहिलं आहे, “पीओव्ही…ट्रोलिंग गांभीर्याने घेत आहे…” याबरोबर त्यांनी हसण्याचा इमोजी दिला. तर या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, “आम्ही नक्कीच प्रत्येकाच्या असलेल्या वेगवेगळ्या मतांचा आदर करतो. लेट्स रॉक.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “तुमच्या कपाळावर कसली खूण आहे?” अखेर ऐश्वर्या नारकर यांनी केला खुलासा, म्हणाल्या…

तर आता त्या दोघींचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून त्यावर कमेंट करत नेटकरी ऐश्वर्या नारकर यांचा हा अंदाज आवडल्याचं सांगत आहेत. याबरोबरच ट्रोल करणाऱ्यांकडे बघण्याच्या या दृष्टिकोनाचं कौतुक करत आहेत.