अक्षया देवधर व हार्दिक जोशी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय कपल आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या हार्दिक-अक्षयाने डिसेंबर २०२२मध्ये लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. लग्नानंतर अक्षय-हार्दिकचा हा पहिलाच गुढीपाडवा आहे.

राणादा-पाठकबाईंनी लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. पुण्यातील राहत्या घरी अक्षया-हार्दिकने गुढी उभारुन पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला. अक्षयाने गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. चाहत्यांनी हार्दिक-अक्षयाला फोटोवर कमेंट करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> Video: ढोलवादन, लेझीम अन्…; डोंबिवलीच्या शोभायात्रेत आकाश व सायलीचा जलवा, व्हिडीओ व्हायरल

लग्नानंतरच्या पहिल्याच गुढीपाडव्यासाठी अक्षयाने खास लूक केला होता. पिवळ्या व हिरव्या रंगाच्या साडीत अक्षया पारंपरिक लूकमध्ये दिसून आली. तर हार्दिकने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. अक्षयाने या फोटोला “पहिला पाडवा” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>> “१०-२० वर्ष ब्रेक घे” नवीन चित्रपटाचं पोस्टर शेअर करताच अक्षय कुमार ट्रोल, नेटकरी म्हणाले “रिमेक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षया व हार्दिकला ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रसिद्धी मिळाली. हार्दिकने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. ‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटात तो झळकला होता. आता लवकरच हार्दिक ‘वेडात मराठे वीर दौ़डले सात’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो सुंदरी या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.