अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांची लग्नानंतरची पहिली मंगळागौर नुकतीच पार पडली. अक्षयाच्या मंगळागौर समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड झाले आहेत. दोघांनीही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याच मालिकेत ‘बरकत’ची भूमिका साकारलेल्या अमोल नाईकने हार्दिक-अक्षयाच्या मंगळागौर सोहळ्यातील खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : “या सहा लक्ष्मींच्या पावलाने…”, ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला दोन महिने पूर्ण! केदार शिंदे म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रत्येक गावात…”

अमोल नाईकने अक्षयाच्या मंगळागौरीतील खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बायकोच्या मंगळागौरीत हार्दिकची सर्वाधिक चर्चा झाली, या व्हिडीओमध्ये अक्षयासह तो सुद्धा मंगळागौरीचा खेळ खेळताना दिसला. अभिनेता या मंगळागौरीतील विविध खेळांमध्ये आनंदाने सहभागी झाला होता. अमोलने हा व्हिडीओ शेअर करत यावर “पिंगा गं पोरी पिंगा…” हे मंगळागौरीचे गाणे लावले आहे.

हेही वाचा : मेहंदी रंगली गं…! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरी सुरु झाली लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात

अमोलने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, “अहा ची… मंगळागौर, दोघे कायम असेच राहा. बाकी,”स्वामी” आहेतच कायम पाठीशी…श्री स्वामी समर्थ” असे लिहिले आहे. मंगळागौर कार्यक्रमात हार्दिकने बायकोच्या साडीच्या रंगाला मॅचिंग असा झब्बा-कुर्ता परिधान केला होता.

हेही वाचा : “हार्दिकरावांचं नाव घेते…”, मंगळागौरीच्या कार्यक्रमात अक्षया देवधरने नवऱ्यासाठी घेतला खास उखाणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिक आणि अक्षया ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आले. मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. दरम्यान, गेल्यावर्षी २ डिसेंबरला पुण्यात पारंपारिक पद्धतीने हार्दिक आणि अक्षयाचा विवाह सोहळा पार पडला होता.