एप्रिल २०२२ मध्ये अमृता खानविलकरचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटामुळे सर्वत्र तिच्या नावाची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या ‘झलक दिखला जा’च्या दहाव्या पर्वामध्ये अमृता सहभागी झाली होती. अगदी थोड्याच वेळामध्ये तिने हिंदी भाषिक चाहत्यांची मने जिंकली. या कार्यक्रमामुळे तिच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. पण मागच्या आठवड्यामध्ये अमृता तिच्या कोरिओग्राफरसह या कार्यक्रमामधून बाहेर पडली.

तिच्या जाण्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. काहींनी वाहिनी आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यांवर अमृताशी भेदभाव केला आहे असे म्हटले होते. तर बऱ्याचजणांनी ‘त्यांनी कार्यक्रमातील सर्वात उत्तम डान्सरला बाहेर काढलं आता हा शो पाहण्याला मजा येणार नाही’ अशा कमेंट्स केल्या होत्या. अमृताने रविवारचा भाग प्रसारित झाल्यानंतर मनातील भावना व्यक्त केल्या होत्या.

आणखी वाचा – समांथाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज, घटस्फोटानंतर नागा चैत्यनासह पुन्हा एकत्र दिसणार

अमृता खानविलकर सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. या माध्यमाद्वारे ती चाहत्यांशी संवाद साधत असते. अमृताने नुकताच इन्स्टाग्रामवर तिच्या कोरिओग्राफर म्हणजेच प्रतीक उतेकरसह एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती प्रतिकबरोबर व्हायरल गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिने “त्यांच्या मते, एकदा का एखादा डान्स रिअ‍ॅलिटी शो संपला की आम्ही डान्स करणं सोडून देतो. त्यांंचा हा विचार चुकीचा आहे, डान्स हे आमचं आयुष्य आहे”, असे लिहिले आहे. तर तिने या व्हिडीओला “आनंदी राहण्याचे काही शॉर्टकट्स असतात आणि माझ्यासाठी डान्स हा त्या शॉर्टकट्सपैकी एक आहे”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या घरात वाहू लागले प्रेमाचे वारे, प्रसाद जवादेने अमृता देशमुखला केलं प्रपोज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागच्या रविवारी अमृताने सनम जोहरबरोबर मायकल जॅक्सनच्या नृत्यशैलीतला डान्स केला होता. नाचताना ती काही सेकंदांसाठी मध्येच थांबली. ती काही स्टेप्स विसरली होती. पुढे जास्त वेळ न घालवता तिने पुन्हा नाचायला सुरुवात केली. सादरीकरणादरम्यान झालेल्या या चुकीमुळे ती कार्यक्रमाबाहेर पडली.