आनंद इंगळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकं, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पहिल्याच नाटकाने त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. अलीकडेच त्यांनी सौमित्र पोटे यांच्या मित्रम्हणे पॉडकास्टला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी टेलिव्हिजन विश्वाबद्दल स्पष्ट मत मांडलं.

आनंद इंगळे म्हणाले, “टेलिव्हिजन हे प्रत्येक गोष्टीचं बलस्थान आहे. महाराष्ट्रात तरी छोट्या पडद्यावर काम करणारे नट हे टेलिव्हिजनमुळे घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. पण, त्याच लोकप्रियतेबरोबर एक तोच-तोच पणा येतो आणि ज्या कोणत्याच घरात होत नाही अशा गोष्टी कराव्या लागतात. अलीकडच्या काळात रात्री दहा वाजता तुम्हाला उद्या सकाळी सात वाजता कॉल टाइम आहे असं सांगितलं जातं. हे काय आहे? ही कोणती सिस्टिम आहे बाबा? नट म्हणतात हे काय आहे… मला हे आवडत नाहीये. दिग्दर्शक म्हणतो, मलाही हे आवडत नाहीये.”

हेही वाचा : Video : “तुरू तुरू चालू नको…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा जबरदस्त डान्स! सर्वत्र होतंय कौतुक

“पुढे, लेखक सांगतो मलाही हे आवडत नाहीये पण, चॅनेल सांगतंय म्हणून करतोय. चॅनेल वाल्यांना विचारलं तर, ते सांगतात आम्हालाही हे आवडत नाही. पण, लोकांची हीच आवड आहे आणि लोक आम्हाला येऊन म्हणतात हे काय घाणेरडं करता तुम्ही बरोबर ना? अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना हे आवडत नाहीये मग हे कोणाच्या आवडीसाठी चाललंय? ही काय पद्धत आहे? पूर्वी टेलिव्हिजनवर ‘पिंपळपान’, ‘प्रपंच’, ‘झोका’, ‘आभाळमाया’ अशा मालिका होत्या. सुंदर, छान ज्यात खरी माणसं दाखवली जायची. हे सगळं कुठे गेलं?” असा सवाल आनंद इंगळे यांनी उपस्थित केला आहे.

आनंद इंगळे पुढे सांगतात, “मला अत्यंत खेद आहे कारण, मला असं वाटतं की टेलिव्हिजनला आता कॅमेराच अभिनय करतो. अर्धा वेळ तर वेगवेगळे शॉट दाखवले जातात. आता ती स्टाइल मागे पडली पण, आता ती एक शिस्त होती ती नाही राहिली. बिचारे नट-नट्या, जे आजकालचे तरूण हिरो – हिरोइन आहेत ते लोक २५ – २५ दिवस सकाळी नऊ ते रात्री दहा – अकरा असं काम करतात. कधी कधी नाइट करतात पुन्हा सकाळच्या शिफ्टला येतात. या सगळ्या गोष्टी कोणापासून लपलेल्या नाहीत. कुणीही मला सांगावं…असं नाहीये. या अशाच गोष्टी चालू आहेत. मग हे कशासाठी चालूये? आणि तरीही लोक म्हणतात एपिसोड का नाहीयेत?”

हेही वाचा : सेटवर विवेक ओबेरॉयचा भीषण अपघात पाहून दिग्दर्शकाला आलेला हृदयविकाराचा झटका; अभिनेता म्हणाला, “अभिषेक बच्चन व अजय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दुसरा एक भयंकर बदल मला टेलिव्हिजनवर जाणवतो तो म्हणजे, अनेक गोष्टी यामुळे रुढ केल्या गेल्या. कोणत्या तरी घरात रोज एक सासू रोज सुनेला लाटण्याने मारतेय…मला वाईट वाटतं की, प्रेक्षक हे सगळं आवडीने पाहतात मग, माझी अभिरुची चाललीये कुठे? आज ८० टक्के लोक हेच म्हणतात काय तुमच्या मालिका? मान्य आहे प्रेक्षकांना अतिरंजित पाहायला आवडतं पण, आपल्याकडे दुसरे विषयच नाहीयेत का? ‘फौजी’सारखी मालिका आज झाली पाहिजे” असं मत आनंद इंगळे यांनी मांडलं आहे.