अभिनेत्री अनिता हसनंदानी तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. २०१३ मध्ये तिने रोहित रेड्डीशी लग्न केलं. अनिता आता एका मुलाची आई आहे आणि आनंदी जीवन जगत आहे. अनिताचं अभिनेता एजाज खानबरोबरचं रिलेशनशिप आणि ब्रेकअपदेखील चर्चेत राहिले आहे. दोघांची भेट ‘काव्यांजली’ शोच्या सेटवर झाली. येथून त्यांची मैत्री फुलली आणि नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
अनिता हसनंदानीने अलीकडेच २००७ मध्ये ‘काव्यांजली’चा सह-अभिनेता एजाज खानबरोबरच्या तिच्या बहुचर्चित नात्याबद्दल आणि त्यानंतरच्या ब्रेकअपबद्दल उघडपणे सांगितले. कोणताही पश्चात्ताप नसल्याची कबुली देताना तिने सांगितले की, जोडीदाराने तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारले पाहिजे.
“बघा, मी खूप काही शिकले. मी एक चांगला माणूस झाले. मला वाटतं आम्ही दोघे खूप चांगले लोक होतो, पण एकमेकांसाठी चांगले नव्हतो. मला फक्त एकाच गोष्टीची खंत आहे की मी माझ्या पहिल्या कारकिर्दीला सोडून दिले. मला ‘वर्षम’ (२००४) नावाचा एक चित्रपट ऑफर करण्यात आला होता, जो एक मोठा तमिळ हिट चित्रपट होता आणि मी तो केला नाही. त्याच्यामुळे नाही, मला तो करायचा नव्हता कारण मला खात्री नव्हती की तो त्या चित्रपटासाठी होकार देईल. त्याने मला कधीही थांबवले नाही. मी काही वाईट करिअरच्या हालचाली केल्या, पण त्याशिवाय कोणताही पश्चात्ताप नाही. तेच जीवन आहे. हृदय तुटते, ब्रेकअप होतो, काहीही असो, तुम्ही प्रत्येक नात्यातून शिकता,” सिद्धार्थ कन्ननला अनिता हसनंदानीने सांगितले.
‘हटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत अनिता हसनंदानीने एक्स बॉयफ्रेंड एजाज खानबरोबरच्या तिच्या नात्याबद्दल सांगितले. ती म्हणाली, “हे माझ्या आयुष्यातील लाँग रिलेशनशिप होते. मी या नात्यासाठी माझ्या आईच्या विरोधातही गेले होते, कारण आमच्या संस्कृती पूर्णपणे वेगळ्या होत्या. तो मुस्लीम होता आणि मी हिंदू. आईने स्पष्टपणे नकार दिला नाही, पण ती नेहमीच काळजीत असायची. एजाज आणि मी वैयक्तिकरित्या चांगले होतो, पण एकमेकांसाठी योग्य नव्हतो आणि शेवटी ते यशस्वी झाले नाही आणि संपले.”
अनिता पुढे म्हणाली की, एजाजबरोबर ब्रेकअप होणे तिच्यासाठी कठीण होते. त्यातून सावरण्यासाठी तिला एक वर्ष लागले. अभिनेत्रीने सांगितले की, एजाज तिला बदलू इच्छित होता. ती म्हणाली, “जर कोणी तुम्हाला बदलून तुमच्यावर प्रेम करू इच्छित असेल तर ते प्रेम नाही. पण मला ते तेव्हा कळले नव्हते, कारण मी प्रेमात पडले होते आणि ज्या व्यक्तीवर मी प्रेम करत होते त्याच्यासाठी मी बदलण्यास तयार होते. जर मी इतके बदलले नसते तर मी एक वेगळी व्यक्ती असती… पुढे जाण्यासाठी मला एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागला.”
अनिताने 2013 मध्ये रोहित रेड्डीशी लग्न केलं, या दोघांना एक गोड मुलगा आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनिता हसनंदानी हे प्रसिद्ध नाव आहे. ती घराघरांत पोहोचली आहे.